वाझोली ग्रामपंचायत बिनविरोध. ग्रामस्थांनी तालुक्याला घालून दिला एक नवा आदर्श.

 
वाझोली/प्रतिनिधी : गावामध्ये एकी निर्माण करत वाझोली ता.पाटण येथील नागरिकांनी ''गाव करील ते राव करील''असा प्रत्येय नुकताच करत गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करत गावच्या नव्या पर्वाला सुरुवात केली.गावात तंटे वाढणार नाहीत,राजकारणातून जन्मोजन्मीचं वैर संपवण्यासाठी गाव गुण्यागोविंदाने एकत्र नांदायला पाहिजे,गावातच भावकी व पाहुणे तसेच इतर समाज विचारांची देवाणघेवाण करत,एक नवा आदर्श घालून देत गावची निवडणूक बिनविरोध पार पाडली.

        ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एकोपा ठेऊन ग्रामपंचायत बिनविरोध काढण्याचा संकल्प करण्यात आला,हा संकल्प तडीस नेहण्यासाठी युवा नेते.संदीप दिनकर मोरे यांनी महत्वाची भूमिका बजावली,गावचा विकास म्हणजे प्रत्येक नागरिकाचा विकास असे समजून गावात वैर संपवण्याचे काम केले.

      गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या वेळी गावामध्ये मुंबई वरून मतदानासाठी गाडी येत असताना पुणे येथे गाडीचा मोठा अपघात झाला ,यावेळी दोन मयत व सहा जण मोठ्या प्रमाणावर गंभीर झाले असा जीवघेणा प्रसंग गावावर ओलांडला होता,याचा दृष्ठांत घेऊन गावातील जेष्ठ नागरिक व युवा वर्ग यांनी हाती संकल्प घेऊन गावची निवडणूक बिनविरोध केली. वाझोली ग्रामपंचायत एकुण ७ सदस्यांची त्यापैकी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री मा.नामदार श्री शंभुराज देसाईसाहेब यांच्या गटाचे ५ सदस्य व पाटण तालुक्याच्याचे युवा नेते मा.श्री सत्यजितसिंह पाटणकर (दादा) यांच्या गटाचे २ सदस्य असे एकुण ७ सदस्य बिनविरोध निवडून देण्यात वाझोली ,डाकेवाडी,सलतेवाडी या तीन्ही गावातील सर्व ग्रामस्थांनी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

      बिनविरोध निवडून आलेले सदस्य अशोक पांडुरंग मोरे,रामचंद्र महादेव चव्हाण,विजया संदीप पाटील,रमेश सदाशिव लोहार,सविता आनंदा मोरे, शितल संजय लोहार,व सुशीला शिवाजी मोरे हे सदस्य बिनविरोध निवडून आले व सर्व समाज माध्यमातून सर्व सदस्य यांचे अभिनंदन करण्यात आले.

         यावेळी उपस्थित म्हणून शिवसेना तालुका अध्यक्ष व माजी सरपंच राजेश चव्हाण पोलीस पाटील विजय सुतार,तंटामुक्ती समिती अध्यक्ष वसंत पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पाटील,आनंदा मोरे,जयवंत पाटील ,धनाजी मोरे, संदीप पाटील,सागर पाटील,शिवाजी मोरे,बाबुराव मोरे,महेंद्र मोरे,आदी ग्रामस्थ उपस्थित होते .