महात्मा गांधीजींचा विचार अंगीकारणे महत्वाचे - पृथ्वीराज चव्हाण


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : सुमारे 70 वर्षांपूर्वी अश्या व्यक्तीला आपल्यापासून हिरावलं गेलं ज्यांनी देशाला केवळ स्वातंत्र्यचं मिळवून दिल नाही तर समाज आणि व्यवस्थेशी संबंधित विचार मांडले. महात्मा गांधीजींच्या या विचारांना आपण अंगीकारणे महत्वाचे आहे असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराड येथे महात्मा गांधीजींना अभिवादन करताना व्यक्त केले. यावेळी मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र उर्फ आप्पा माने, नगरसेवक इंद्रजीत गुजर, मलकापूर शहर काँग्रेस अध्यक्ष नगरसेवक राजेंद्र यादव, अल्पसंख्यांक जिल्हा काँग्रेस अध्यक्ष झाकीर पठाण, कराड दक्षिण युवक काँग्रेस अध्यक्ष वैभव थोरात यांच्यासह मलकापूरचे नगरसेवक यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, गांधीजींच्या सत्य, अहिंसा, सत्याग्रह अशी अनेक तत्व आजच्या काळात समर्पक आहेत. गांधींवादाने जगातील सर्वात मोठ्या सम्राज्यवादी सत्तेला उखडून फेकले गेले. यापासून अनेक दुर्बल देशांनी प्रेरणा घेत स्वातंत्र्य मिळविले. गांधींच्या विचारांना आजही जगात ऐकलं जातं . सत्तर वर्षांपूर्वी त्यांचा जीव घेतला गेला पण त्यांच्या तत्वाना ज्याला आपण गांधींवाद म्हणतो त्याला कोणीच मारू शकत नाही. म्हणूनच म्हटलं जात कि गांधी कभी मरते नही.