काळगाव मध्ये शिवसेनेची एक हाती सत्ता. विरोधी राष्ट्रवादी पॅनलचा धुव्वा...

 


काळगाव|कृष्णाकाठ वृत्तसेवा

पाटण तालुक्यातील काळगाव ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे प.स.सदस्य पंजाबराव देसाई व सुरेश पाटील यांच्या शिवशंभो ग्रामविकास परिवर्तन पॅनलनं एकहाती सत्ता मिळवली आहे.

काळगाव मध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा अटीतटीचा सामना रंगला होता. काळगाव ग्रामपंचायतीत एकूण 11 जागा आहेत. त्यातील 1 जागा बिनविरोध झाली होती. 10 जागांसाठी निवडणूक पार पडली. त्यामध्ये सर्वच्या सर्व  म्हणजे 10 जागा शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार निवडून आले आहेत.तर राष्ट्रवादीच्या निनाई देवी ग्रामविकास परिवर्तन पॅनलला मात्र इथे भोपळाही फोडता आला नाही.त्यामुळे ग्रामपंचायतीवर पंजाबराव देसाई ,सुरेश पाटील यांच्या नेतृत्वातील शिवशंभो ग्रामविकास परिवर्तन पॅनलनं निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे.

विजयी उमेदवार : वसंतराव देसाई,सौ.संजीवनी नलवडे,महादेव पाटील,सौ.सुजाता मानुस्करे , शंकर कुष्टे,शिवाजी पवार,सौ.राखी काळे,सौ.सविता लोटळे, बाबुराव मस्कर,सौ.स्वाती सुतार,

बिनविरोध निवड झालेल्या सौ.स्वाती संजय बावडेकर. 

निकालानंतर विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष व्यक्त केला.