मुंबईतील गोवंडी परिसरातून वॉन्टेड झालेल्या आरोपीला साताऱ्यातुन अटक



मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा :  मुंबईतील गोवंडी परिसरात एकाची हत्या करण्याचा प्रयत्न करून सुमारे एक वर्षांपासून वॉन्टेड असलेल्या एका आरोपीला सातारा जिल्ह्यातुन मोठ्या शिताफीने अटक करण्याची कामगिरी गोवंडी पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने पार पाडली आहे.

गोवंडीतील देवनार गावातील सुंदरबाग येथे एकाची हत्या करण्याचा प्रयत्न करणारा सतेश उर्फ सल्ला शंकर समिंदर (२१) हा गेल्या वर्षभरापसून  मुंबईतून वॉन्टेड झाला होता.गोवंडी पोलिस त्याच्या शोधासाठी जंग जंग पछाडत होते. मात्र त्यांना यश येत नव्हते .अखेर गोवंडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे यांनी   पोलीस निरीक्षक कोयंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नाळे ,पोलीस शिपाई बाड ,अभंग यांचे विशेष पथक तयार केले.त्यानंतर या पथकाने साताऱ्यात जाऊन वॉन्टेड आरोपी सतेशला माण तालुक्यातील म्हसवड - देवापुर गावातून मोठया शिताफीने ताब्यात घेतले आहे .या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक धायगुडे हे करीत आहेत .या आरोपीवर गोवंडी आणि देवनार पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न , मारहाण , धमकावणे इत्यादी प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत.