सामाजिक कार्यकर्त्या कविताताई कचरे यांचा वाढदिवस उत्साहात



 ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
 सामाजिक कार्यकर्त्या, सिताई फाउंडेशन व सिताई महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षा कविताताई कचरे यांच्या वाढदिवसानिमित्त तळमावले तालुका पाटण येथे रक्तदान शिबिर भव्य महिला मेळावा बचत गट मेळावा व्यवसाय प्रशिक्षण व मार्गदर्शन तसेच हळदीकुंकू समारंभ अशा विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
 यावेळी कोल्हापूर येथील उदयोजिका सुमित्रा भोसले, तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.उमेश गोंजारी, मनीषा पांडे, तळमावले च्या सरपंच शोभा भुलुगडे, वैशाली भुलुगडे, भाजपा कराड शहराध्यक्ष सीमा घार्गे, शितल कुलकर्णी ,धनश्री रोकडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

 सिताई फाउंडेशन व सिताई महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी व महिला बचत गटातील कार्यकर्त्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली, यावेळी व्यवसाय प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिरामध्ये सुमित्रा भोसले व मनीषा पांडे यांनी महिलांना स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन केले. यावेळी पाटण तालुक्यातील कोरोना योद्धांचा सन्मान देखील करण्यात आला. यावेळी चिखलेवाडी ता. पाटण येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार कविताताई कचरे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

 यावेळी बोलताना कविताताई कचरे म्हणाल्या , वाढदिवसानिमित्त आपण समाजाला काहीतरी देणे लागतो या उद्देशाने विविध महिलांना व्यवसाय प्रशिक्षण शिबीर व रक्तदान शिबीर हे आयोजित करताना आज विशेष आनंद होत आहे. पाटण तालुक्यातील व सातारा जिल्ह्यातील हजारो महिलांना सिताई फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही गेली ५ वर्षे नेहमीच स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहोत. तसेच या पुढील काळातही पाटण तालुक्यातील व सातारा जिल्ह्यातील महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध ठिकाणी मेळावे व प्रसंगी महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सिताई महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून मदत केली जाईल.
 यावेळी कोल्हापूर येथील उद्योजिका सुमित्रा भोसले व मनीषा पांडे यांनी महिलांना मार्गदर्शन करीत त्यांचा आत्मविश्वास वाढला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष जगदाळे यांनी केले तर आभार सतीश कचरे यांनी मानले.