पाटण विधानसभा मतदार संघात ७१ ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचा भगवा. ना.शंभूराज देसाई यांचा मोठा विजय.

113 ग्रामपंचायतीपैकी 71 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा, 530 सदस्य विजयी



दौलतनगर दि.18 : राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील असणाऱ्या सातारा जिल्हयातील पाटण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईनी नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकांमध्ये चांगलीच मुसंडी मारली आहे. ना.शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली पाटण मतदारसंघात एकूण 113 ग्रामपंचायतीपैकी 71 ग्रामपंचायतीवर शिवसेना पक्षाचा झेंडा फडकला आहे.यामध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईचे नेतृत्वाखाली 530 सदस्य शिवसेना पक्षाच्या माध्यमातून निवडून आलेले आहेत. 113 ग्रामपंचायतीमध्ये 06 ग्रामपंचायतीमध्ये समसमान उमेदवार विजयी झालेले आहेत.पहिल्या टप्प्यात पाटण मतदारसंघात एकूण 119 ग्रामपंचायतीपैकी 36 ग्रामपंचायती या बिनविरोध निवडून आल्या होत्या यामध्येही शिवसेना पक्षाने 21 ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळवत गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली बाजी मारली होती.

                  आज ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा निकाल जाहीर होताच गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाच्या माध्यमातून निवडून आलेल्या 71 ग्रामपंचायतीमधील सर्व सदस्यांनी ना.शंभूराज देसाईंची दौलतनगर येथे प्रत्यक्ष भेट घेतली. ना.शंभूराज देसाईंच्या भेटीकरीता 530 सदस्यांनी दौलतनगर येथे तोबा गर्दी केली होती.