एसपी अजयकुमार बन्सल यांना 7000 वी कलाकृती भेट


तळमावले/कृष्णाकाठ वृत्तसेवा :

सातारा जिल्हयाचे एसपी अजयकुमार बन्सल यांना विश्वविक्रमवीर कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांनी 7000 वी कलाकृती भेट दिली. ‘व्हेरी गुड, खुपच सुंदर’ अशा शब्दांत अजय कुमार बन्सल यांनी डाकवे यांचे कौतुक केले. एसपी अजयकुमार बन्सल देखील डाकवे यांच्या या अनोख्या भेटीने भारावले. त्यांनी संदीप डाकवे यांनी विविध उपक्रमांची माहिती घेत त्यांना शुभेेच्छा दिल्या. कलेच्या विविध माध्यमात काम करत असलेल्या डाॅ.संदीप डाकवे यांनी आतापर्यंत सेलिब्रिटी, विविध क्षेत्रातील दिग्गजांना रेखाचित्र, शब्दचित्र, अक्षरगणेशा देवून ‘सरप्राईज भेटी’ दिल्या आहेत.

यापूर्वी डाॅ.संदीप डाकवे यांनी 100 वे रेखाचित्र अग्रलेखांचे बादशहा पद्मश्री नीलकंठ खाडीलकर, 500 वे रेखाचित्र पद्मश्री डाॅ.प्रकाश आमटे, 1000 वे रेखाचित्र अभिनेते भरत जाधव, 2000 वे रेखाचित्र अभिनेते सुबोध भावे यांना, 3000 वे रेखाचित्र अभिनेत्री अश्विनी महांगडे यांना, 4000 वे स्केच सुप्रसिध्द गायिका कविता राम यांना, 5000 वे रेखाचित्र सातारा जिल्हयाच्या माजी एसपी तेजस्वी सातपुते यांना, 6000 वे रेखाचित्र सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांना तर 7000 वे स्केच एसपी अजयकुमार बन्सल यांना दिले आहे. विशेष म्हणजे डाॅ.संदीप डाकवे यांनी या कलेतून मिळणारे मानधन गरजूंना देवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. तसेच स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातूनही विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत.