शैक्षणिक उपक्रमामधुन गुणवत्ता विकास: अनिल कदम.


फलटण/प्रतिनिधी :

महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण मंत्रालय, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था,पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,फलटण, सातारा जिल्हा परिषद, शिक्षण विभाग,फलटण पंचायत समिती, शिक्षण विभाग यांचे विधायक ऑनलाईन व ऑफलाईन शैक्षणिक उपक्रमामधुन शैक्षणिक विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने विद्यार्थी व पालक, शिक्षक सहभाग प्रेरणादायी मिळत असल्याने कोविड-१९ काळातील शिक्षणाचे प्रगती अखंडपणे चालू आहे असे मतप्रतिपादन गिरवी व आरडगांव केंद्राचे प्रयोगशील व उपक्रमशील केंद्रप्रमुख अनिल कदम यांनी केंद्रस्तरीय ऑनलाईन शिक्षण परिषदेस मार्गदर्शन करताना केले.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचेकडील परिपत्रक नुसार आयोजित ऑनलाईन केंद्रस्तरीय शिक्षण परिषद मध्ये मुख्याध्यापक, पदवीधर प्राथमिक शिक्षक,विषय शिक्षक,उपशिक्षक या प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षकांना मार्गदर्शन करताना अनिल कदम बोलत होते.

 यावेळी अनिल कदम पुढे म्हणाले की,"विद्यार्थी केंद्रबिंदू मानून शिक्षकांनी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने शिक्षणासाठी शासन धोरणानुसार नियोजन करुन अंमलबजावणी करावी.विद्यार्थी गुणवत्ता विकास कार्यक्रम वर्ग व शाळा पातळीवर प्रभावीरीत्या यशस्वीपणे राबवावा.यासाठी गिरवी व आरडगांव केंद्रातील शिक्षकांची धडपड व प्रयत्न कौतुकास्पद व प्रेरणादायी आहेत.

 या प्रसंगी तंत्रस्नेही व तज्ञ शिक्षक श्रीमती.उमा भोसले, सुनिल तिवाटणे, अभिजित रणवरे,संजय शिंदे,मधुकर शिंदे,सतीश जाधव यांनी व्हाटसअप स्वाध्याय, गोष्टींचा शनिवार व मिस काॅल द्या-गोष्ट ऐका,रिड टु मी, शैक्षणिक कृतिपत्रिका,प्रकल्प व अहवाल, वाचनालय, ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण या विषयावर चर्चासत्राचे माध्यमातून पीपीटी,आलेख, व्हिडिओ,चित्रे या व्दारे सादरीकरण करण्यात आले. शंकासमाधान व गटचर्चा घेणेत आली. प्रास्ताविक व स्वागत भगवंतराव कदम यांनी केले. या ऑनलाईन शिक्षण परिषदेस गिरवी व आरडगांव केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक उपस्थित होते.