सातारा जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदीचे आदेश जारी : जिल्हाधिकारी शेखर सिंह
सातारा दि. 10 (जिमाका) : कोरोना या संसर्गजन्य विषाणूचा वाढता प्रादुर्भाव प्रतिबंधीत करण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस दलाकडुन विविध उपाय योजना अंमलात आणल्या जात आहेत. या संबंधाने अंमलात असलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांची अंमल बजावणी करण्यात येणारी प्रतिबंधक कारवाई अशा वेळी तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सातारा जिल्हयातील विविध ठिकाणी कोरोना या संसर्गजन्य विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या संबंधाने बंदोबस्त कर्तव्य पार पाडीत असलेल्या पोलीस तसेच गृहरक्षक यांच्यावर हल्ला झाल्याच्या आत्तापर्यंत 09 घटना घडलेल्या आहेत. तसेच अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती झाल्यास त्यातुन देखील कायदा व सुव्यवस्था प्रश्न अथवा तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
सातारा जिल्ह्यात म्हसवड पोलीस स्टेशन हददीत मौजे म्हसवड ता. माण याठिकाणी सालाबाद प्रमाणे श्री. सिध्दनाथ व आई जोगेश्वरी माता वार्षिक यात्रा 13 ते 18 डिसेंबर 2020 कालावधीत साजरा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच 21 डिसेंबर 2020 रोजी शासनाच्या वतीने कोविड 19 च्या अनुषंगाने योग्य त्या सूचनांचे पालन करुन महाबळेश्वर पोलीस ठाणे हददीत किल्ले प्रतापगड येथे शिवप्रतापदिन साजरा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर दिवशी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने वाई पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाई व मेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुडाळ येथे शिवप्रतापदिन उत्सवाचे निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सदर सण वउत्सव कालवधीत कोणताही कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याचीशक्यता नाकारता येत नाही.
मराठा आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाज व मराठा क्रांती ठोक मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या भावना तिव्र झालेल्या असून यासंदर्भात राज्यात विविध ठिकाणी तिव्र स्वरुपाची आंदोलने झालेली आहेत. याच्या प्रतिक्रिया सातारा जिल्ह्यात उमटल्यास अथवा अशा प्रकारची आंदोलने सातारा जिल्ह्यात झाल्यास कायदा वसुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
केंद्र शासनाने मंजूर केलेली 3 कृषि विषयक विधेयकांना विविध शेतकरी संघटना तसेच राजकीय पक्ष/संघटना यांच्याकडून विरोध होत असून सदरची विधयेके रद्द होणे संबंधाने आक्रमक पवित्रा घेण्यात आलेले असून ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. तसेच शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांचे नेतृत्त्वात ऊस एफआरपी व शेतकऱ्यांची वीज बिले माफ करावी या मागण्यांसंदर्भात देखील कोणत्याही वेळी आंदोलनात्मक प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सदर कालावधीत एखाद्या घटनेवरुन अथवा प्रकारावरुन कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण शक्यता नाकारता येत नाही.
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील झालेले नुकसान पाहता त्यांच्या भावना तिव्र झाल्या असून शासनाकडून त्वरीत मदत मिळावी म्हणून शेतकऱ्यांची आग्रही भूमिका घेतलेली असून त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास त्यांच्याकडून देखील कोणत्याही वेळी आदोलनात्मक प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
अद्यापी देखील राज्यात विविध ठिकाणी वाढीव विज बिलाच्या संदर्भात महावितरण कार्यालयाचे अथवा अन्य ठिकाणी मोठया प्रमाणात आंदोलने होत असून त्यास विविध वृत्तमाध्यमातून मोठया प्रमाणात प्रसिध्दी मिळत आहे. तसेच भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच आम आदमी पक्ष व बहुजन वंचित आघाडी यांचे वतीने उग्र स्वरुपाचे विविध प्रकारचे आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येणार असल्याचे समजून येत आहे. अशा प्रकारची आंदोलने सातार जिल्ह्यात झाल्यास त्यावरुन देखील कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लहुजी शक्ती सेना संस्थापक विष्णू कसबे यांच्या वतीने लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरीता 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर रोजी पर्यंत महाराष्ट्रातील सर्व आमदार, खासदार यांचे निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करणार असलेबाबत इशारा दिलेला आहे. कालावधीत कोणताही कायदा व सुव्यवस्था परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
सातारा जिल्हयातील एकूण 15 विविध परीक्षा केंद्रावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर यांचे मार्फत 10 वी व 12 वी परीक्षा 20 नाव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे. तसेच धनंजय गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स, सातारा व कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, सातारा या कॉलेजवर 21 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत चार्टर्ड अकाउंटन्स परीक्षा घेण्यात येणार आहेत. सदर परीक्षाकालावधीत कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
 सातारा जिल्ह्यात नागरिक विविध मागण्यासाठी विकास कामांसाठी तसेच इतर कारणासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा व इतर शासकीय कार्यालय या ठिकाणी उपोषण, आत्मदहन, धरणे आंदोलन करणार असलेबाबत इशारा देत असतात त्यांना पोलीस व प्रशासनाच्या वतीने वारंवार परावृत्त करण्याचा प्रयत्न केला जातो. तरी उपोषण व आत्मदहन कालावधीमध्ये कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार अगर कायदा सुव्यवस्था प्रश्न जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी संपूर्ण सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) अन्वयेचे शस्त्रबंदी आदेश व कलम 37 (3) अन्वये 11 डिसेंबर राजी 00.00 वा पासून ते 24 डिसेंबर रोजी 24.00 वा. पर्यत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केले आहे. या कालावधीत शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, बंदूका, सुऱ्या, काठया किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापराता येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा अस्त्र, सोडावयाची अस्त्र, फेकावयाची हत्यार किंवा साधणे बरोबर घेणे, जमा किंवा तयार करणे, व्यक्तीची अगर प्रेते किंवा त्यांचे प्रतिमेचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक रीतीने घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजवणे, सभ्यता अगर निती या विरुध्द असतील अशी किंवा राज्याची असतील अशी किंवा राज्याची शांतता धोक्यात येईल असे प्राधिकाऱ्यास वाटेल अशी भाषणे करणे हावभाव करणे सोंग आणाणे अशी मनाईचे उल्लंघन करुन जर कोणताही इसम अशी कोणतीही वस्तु बरोबर घेवून जाईल किंवा कोणत्याही जिन्नस किंवा वस्तु तयार करणे किंवा त्यांचा लोकांत प्रसार करणे. अशा मनाईचे उल्लंघन करुन जर कोणताही इसम अशी कोणतीही वस्तु बरोबर घेवून जाईल किंवा कोणताही जिन्नस दाहक पदार्थ किंवा अस्त्र जवळ बाळगतील तर तो कोणत्याही पोलीस अधिका-याकडून निशस्त्र केले जाणेस किंवा दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ क्षेपणास्त्र त्यांच्याकडून जप्त केले जाण्यास पात्र असेल आणि अशा त-हेने जप्त केलेली वस्तु दाहकपदार्थ, स्फोटक पदार्थ किंवा क्षेपणास्त्र हे सरकार जमा होईल. पोटकलम (3) अन्वये असलेल्याअधिकारान्वये सार्वजनिक सुव्यवस्था राखणेसाठी कोणत्याही जमवास किंवा मिरवणूकीस वरील कालावधीत व कार्यक्षेत्रात या आदेशान्वये मनाई करीत आहे.
मुंबई पोलीस अधिनियम 1951 (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम 37(1)(3) मधील या हुकुमाच्या तरतुदी खालील नमुद केलेल्या इसमाना लागू होणार नाही. शासनाची सेवा करणारे किंवा नोकरी करणेच्या कामी ज्यांच्या वरीष्ठांनी निर्दीष्ट केलेवरून अगर त्यांना कर्तव्याच्या स्वरुपामुळे अशी खंड 1 मध्ये उल्लेखलेल्या पैकी वस्तु धारण करणे किंवा देणे आवश्यक आहे, ज्यांना ज्यांना शारिरीक दुर्बलतेच्या कारणावरुन जिल्हादंडाधिकारी अगर त्यांना प्राधिकृत केलेले अधिकाऱ्यांना, लाठी किंवा काठी वापरणेस परवानगी दिली असेल अशी व्यक्ती, सदरचा आदेश यात्रा, धार्मिक कार्य, लग्न विधी कार्य तसेच अत्यविधी कार्यास लागू होणार नाही, ज्या लोकांना शांततेचा मार्गाने एकत्र जमून कोणताही कार्यक्रम साजरा करावयाचा असेल त्याचवेळी पोलीस अधिक्षक, संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरिक्षक यांची आगावू परवानगी घेतली असेल तर त्यांना सदरचा आदेश लागू होणार नाही.