‘स्क्रिबलिंग’ मधून साकारले शरद पवारांचे स्केच











तळमावले/वार्ताहर :
राष्ट्रवादी काॅंगेेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसाचे औचित्य त्यांचे अनोखे पोट्रेट साकारले आहे, ही किमया केली आहे पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील युवा चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी कलेच्या माध्यमातून नेहमी विविध उपक्रम राबवत असलेले संवेदनशील कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांनी ‘स्क्र्रिबलिंग’ करत शरद पवार यांचे हुबेहुब चित्र साकारले आहे. या चित्राचे सर्वत्र कौतुक होत आहे. काळ्याा रंगाच्या जेल पेनच्या साहय्याने गिरगिरटत हे चित्र त्यांनी तयार केले आहे. डाॅ.संदीप डाकवे यांनी कलेतून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. या उपक्रमांतून थेट गरजूंना देखील मदत झाली आहे. नावीण्यपूर्ण उपक्रमामध्ये त्यांनी खडूतनू अष्टविनायक, मोरपिसावर संत तुकाराम, जाळीदार पिंपळपानावर श्रीगणेश, छत्रीवर व्यसनमुक्ती संदेश, एक दिवा जवानांसाठी, पोस्टरमधून वारकऱ्यांना शुभेच्छा, कॅलिग्राफीतून जवानांना सलाम इ.सारखे अनेक उपक्रम राबवले आहेत.
शरद पवार यांना वाढदिवसानिमित्त आगळ्यावेगळ्या चित्रातून शुभेच्छा द्याव्या अशी संकल्पना डाॅ.डाकवे यांच्या मनामध्ये आली आणि त्यानुसार ‘स्क्रिबलिंग’ करुन हे चित्र त्यांनी साकारले आहे. डाॅ.संदीप डाकवे यांनी साकारलेले हे आगळे वेगळे चित्र निश्चितच सर्वांच्या पसंतीस पडेल.
Popular posts
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे फिरणारी ती पोस्ट चुकीची व खोटी
इमेज
साताऱ्यात राष्ट्रवादीला सुरुंग, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ शिवसेनेत दाखल.
इमेज
पाटण बाजार समितीच्या सभापतीपदी बाळकृष्ण पाटील तर उपसभापतीपदी विलास गोंडांबे यांची निवड.
इमेज
मान्याचीवाडी गावाने पटकावला पन्नास लाख रुपयांचा माझी वसुंधरा अभियान राज्यस्तरीय पुरस्कार.
इमेज
कुंभारगाव ग्रामपंचायती तर्फे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण.
इमेज