कुंभारगाव विभागात बिबट्याची दहशत.

नागरिकांना सावध राहण्याच्या वनविभागाकडून सूचना
कुंभरगाव | राजेंद्र पुजारी :
कुंभारगाव ता.पाटण येथील कळंत्रेवाडी नजीक तानाजी कळंत्रे यांच्या राहत्या घराच्या पाठीमागील भिताडवाडी शिवारात शाळवाच्या शेतात मृत अवस्थेत रानडुकराचे पिल्लू आढळून आले. जागेवरील स्थितीचा संशय आल्याने याची माहिती तानाजी कळंत्रे यांनी कुंभारगाव वन रक्षक एस एस पाटील व वनपाल एस एस राऊत यांना दिली माहिती मिळताच वनरक्षक पाटील यांनी जागेवरील पाहणी केली शाळवाची ताटे आडवी पडल्याचे दिसून आले मृत रानडुकर पिल्लाचा पंचनामा केला, बिबट्यानेच ठार मारले व गळ्याचा चावा घेऊन रक्त पिल्याचे प्रथम दर्शनी दिसत असल्याचे सांगितले, तसेच कुंभारगाव शिबेवाडी येथील रमेश नारायण शिंदे राहत्या घराच्या बाहेरील छटीतील 3 वर्षाच्या शेळीवर हल्ला चढवला व गळ्याचा चावा घेतला. सुदैवाने घरातील लोकांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली. या ठिकाणची पाहनीत घरच्या बाहेर बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले वनरक्षक, वनपाल यांनी शेळीला तळमावले येथील दवाखान्यात प्राथमिक उपचार केले, परंतु शेळी भेदर्ल्याला अवस्थेत दिसून येत असल्याचे पाटील यांनी सांगितले, वनपाल एस एस राऊत व वनरक्षक एस एस पाटील यांनी परिसरातील नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना केल्या सायंकाळनंतर एकटे घराच्या बाहेर पडू नका, आपली जनावरे रात्रीची बाहेर ठेवू नका, प्रत्येकानी काळजी घ्या, कारण ज्या भागात हल्ला झाला त्या विभागात बिबट्याचा वावर 4-5 दिवस राहू शकतो असे अहवान करण्यात आले.

(छाया : अनिल देसाई )
बिबट्याच्या हाल्यात मृत झालेले  रानडुकर

बिबट्याच्या हाल्यात जखमी झालेली शेळी