ऑनलाइन ध्यान महाशिबीराचा उद्यापासून प्रारंभ.

कराड / प्रतिनिधी : 

सध्या सुरू असलेले २०२० हे वर्ष संपण्यासाठी फक्त पंधरा दिवसांचा अवधी राहिला असूनदेखील कोरोना महामारीचे वैश्विक युद्ध सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने स्वतःचे आत्मिक बळ वाढविणे गरजेचे असून त्यासाठी नियमित ध्यान करणे हाच सोपा मार्ग आहे. हे साऱ्या जगाला पटवून दिलेले सदगुरू शिवकृपानंद स्वामी यांच्या दिव्य सान्निध्यात बुधवार, २३ ते बुधवार ३० डिसेंबरपर्यंत निःशुल्क ऑनलाईन ध्यान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सदगुरू शिवकृपानंद स्वामी हे एक साक्षात्कारी ऋषी असून बालपणापासूनच सत्याच्या शोधात असलेल्या स्वामीजींनी १६ वर्षे हिमालयात जैनमुनी, बौद्ध,कैवल्यकुंभक योगी, गुरुंच्या सान्निध्यात ध्यान साधना केली व आध्यात्मिक ज्ञान मिळविले. ते हिमालयातील अनुभूतीप्रधान अमूल्य ध्यान योग १९९४ पासून देश-विदेशांमध्ये ते निःशुल्क वाटत आहेत. २५ सप्टेंबर २०१९ रोजी स्वामीजींचे पंढरपूर येथे महाशिबिर झाले होते. बुधवार २३ ते बुधवार ३० डिसेंबर याकालावधीत दररोज सकाळी सहा ते आठ याकालावधीत सद्गुरू शिवकृपानंद स्वामीजींच्या दिव्यसान्निध्यात youtube.comGurutattva.org या चॅनेलवर व www.Gurutattva.org या संकेतस्थळावर या महाशिबिराचे थेट प्रक्षेपण आयोजित केले आहे. 

या महाशिबिरात साधनेद्वारा प्राप्त केलेले आध्यात्मिक गूढ ज्ञान सोप्या भाषेत स्वामीजी विषद करणार आहेत.