गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांचा सातारा जिल्हा दौरा.सातारा दि. 7 : राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन , राज्य उत्पदन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभुराज देसाई हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे. 

 मंगळवार दि. 8 डिसेंबर 2020 रोजी सोईनुसार दौलतनगर, ता. पाटण येथे आगमन व मुक्काम. बुधवार दि. 9 डिसेंबर रोजी दुपारी 4 वा. पर्यंत लग्न समारंभांना भेटी व नियोजित बैठकांना उपस्थिती (स्थळ: दौलतनगर, ता. पाटण, जि. सातारा). दुपारी 4.30 वा. दौलतनगर ता. पाटण येथून चेमरी शासकीय विश्रामगृह कोयनानगर ता. पाटणकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. 

 गुरुवार दि. 10 डिसेंबर रोजी कोयनानगर येथील कार्यक्रमांना उपस्थिती व सोईनुसार सातारा निवासस्थानकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. 

 शुक्रवार दि. 11 डिसेंबर रोजी सकाळी 10.55 वा. सातारा निवासस्थान येथून जिल्हा परिषद, साताराकडे प्रयाण. सकाळी 11 वा. महा आवास अभियान ग्रामीण जिल्हास्तरीय कार्यशाळा कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह, जिल्हा परिषद, सातारा). दुपारी 12.00 वा. जिल्हा परिषद सातारा येथून शासकीय विश्रामगृह कराडकडे प्रयाण. दुपारी 1 वा. शासकीय विश्रामगृह कराड येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वा. शासकीय विश्रामगृह कराड येथून सप्तपदी मंगल कार्यालय, वडगाव हवेली, ता. कराड जिल्हा साताराकडे प्रयाण. दुपारी 2.20 वा. श्री. नानासाहेब शंकरराव पवार, रा. पाटण यांचे चि. संकेत यांचे विवाह सोहळ्यास उपस्थिती. सोईनुसार दौलतनगर ता. पाटण येथून निवासस्थान साताराकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.