वांगव्हॅली पत्रकार संघाकडून गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचा सत्कार


तळमावले/प्रतिनिधी :

ढेबेवाडी विभागातील वांगव्हॅली पत्रकार संघाच्यावतीने गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई (गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन महाराष्ट्र राज्य) यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तळमावले येथील एका कार्यक्रमात हा सत्कार करण्यात आला.

सदर सत्कारप्रसंगी वांगव्हॅली पत्रकार संघाचे संस्थापक चंद्रकांत चव्हाण, अध्यक्ष संजय लोहार, तुषार देशमुख, डाॅ.संदीप डाकवे व पत्रकार संघाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी चंद्रकांत चव्हाण यांनी संपादित केलेल्या ‘कृष्णाकाठ’ या दिवाळी अंकाचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई व अन्य मान्यवर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच पत्रकार संघाचे डाॅ.संदीप डाकवे यांनी रेखाटलेल्या 54 चित्रांची फ्रेमही यावेळी देण्यात आली. ना.शंभूराज देसाई यांनी वांगव्हॅली पत्रकार संघाच्या विविध उपक्रमांची माहिती घेवून संघाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.