ढेबेवाडी विभागातील जिंती रिंग रोडचे डांबरीकरणाचे काम तातडीने पूर्ण करा अन्यथा जनआंदोलन करू ग्रामस्थांचा इशारा.

ढेबेवाडी/प्रतिनिधी :

नव्याने तयार झालेला व महिनाभरात उध्दवस्त झालेला जिंती रिंगरोडचे फेर डांबरीकरणाचे काम दोन वर्षां पासून रखडलेले आहे ह्या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण करावे अशी मागणी जिंती विभागातील ग्रामस्थ करत असून रस्त्याच्या कामासाठी प्रसंगी जनआंदोलन उभे करू असा इशारा देण्यात आला आहे

 जिंतीसह परीसरातिल वाढल्या वस्त्याना उपयुक्त असणारा मुख्य रस्ता वांग मराठवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्याने त्याचे १९९७ पासुन मजबुती करण झालेच नाही किंबहुना ग्रामस्थांच्या नशिबी कायमचं खडतर प्रवास होता तिन वर्षांपूर्वी रिंगरोडची निर्मीती झाली त्या नंतर डांबरीकरण करण्यात आले मात्र केलेले डांबरीकरणाचे काम पहिल्या पावसात उध्दवस्त झाल्याने पाच कोटी १९ लाख रुपयांचा निधी नेमका मुरला कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे झालेल्या निकुष्ठ कामा संदर्भात प्रसिध्दी माध्यमांनी आवाज उठवल्या नंतर रस्ता उकरून पून्हा मजबूती करण व डांबरीकरणाचे आदेश देण्यात आले मजबुती करणाचे काम झाले असले तरी दोन वर्षांपासून डांबरीकरणाचे काम रखडले आहे त्यामुळे मजबुती करण केलेला रस्ता पुन्हा रखडण्याची भिती निर्माण झाली आहे संबंधित विभागाने लक्ष घालून तातडीने रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी होत आहे

  रखडलेल्या रींगरोडचे काम संबंधित   विभागाने लक्ष घालून तातडीने पुर्ण   करायला हवे नाही तर प्रसंगी जनआंदोलन उभे करू
जगन्नाथ विभुते
धरणग्रस्त प्रतिनिधी