सौ.कमल दिनकर पाटील यांचे निधन

 


तळमावले/वार्ताहर :

जिंती (पलीकडील आवाड) ता.पाटण येथील सौ.कमल दिनकर पाटील यांचे मंगळवार दि. 8 डिसेंबर, 2020 रोजी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांच्या घरी पती, दोन मुले, एक मुलगी, एक सुन, दोन जाऊ, एक दीर, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन लक्ष्मण बोत्रे यांच्या त्या भगिनी होत. त्यांचा रक्षाविसर्जन विधी शुक्रवार दि. 11 डिसेंबर, 2020 रोजी सकाळी 9 वाजता जिंती (पलीकडील आवाड) ता.पाटण जि.सातारा येथे घेण्यात येणार आहे. मनमिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.