शिवसमर्थची प्रगती नेत्रदीपक - काकासो पाटील


तळमावले/वार्ताहर

दि शिवसमर्थ मल्टीस्टेट को.आॅप.क्रेडीट सोसायटी लि; तळमावले ची प्रगती नेत्रदीपक आहे. असे गौरवोद्गार सातारा जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासोा पाटील यांनी काढले. ते शिवसमर्थ संस्थेच्या सातारा एमआयडीसी शाखेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी युवा उद्योजक रफीक फरास, आॅडीटर मणेर साहेब, सुनील ढेंबरे, संजय पाटील, शिवाजी सुर्वे, उपमहाव्यवस्थापक हेमंत तुपे, सुदाम फिरंगे, देवबा वायचळ, विठ्ठलराव पाचुपते, संजय पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनानंतर काकासो पाटील यांनी संस्थेच्या एकंदरित वाटचालीचा आढावा घेतला. या कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त करत संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी परिसरातील अनेक मान्यवरांनी संस्थेला सदिच्छा भेटी देवून शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, संस्थेच्या शिवसमर्थ प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वच्छ, पारदर्शक कारभाराने लोकांच्या विश्वासास पात्र ठरलेने अवघ्या 14 वर्षात 49 शाखांसह संस्थेने 200 कोटी ठेवींची उलाढाल केली आहे. त्याचबरोबर चांगला नावलौकीक प्राप्त केला आहे. संस्था 365 दिवस अविरत सेवा कार्यरत असते. या संस्थेने आर्थिक देवाण-घेवाणीबरोबरच सामाजिक बांधिलकी म्हणून संस्थेच्या वतीने अनेक उपक्रम राबवले आहेत. संस्थेने सातत्याने अनेक आकर्षक ठेव योजना सुरु केल्या आहेत. संस्थेच्या माध्यमातून आर्थिक सेवा देत असताना ग्रामीण भागातील लोकांची पत वाढवणे, त्यांना मानसन्मान देणे विनामुल्य घरपोच सेवा देणे, एका शाखेतून दुसÚया शाखेत विनामुल्य पैसे घेण्याची सुविधा देणे असे नाविण्यपूर्व उपक्रम राबिवले आहेत.

तसेच संस्थेचे स्वमालकीचे मुख्य कार्यालय, सुसज्ज असे सी.बी.एस. आॅन लाईन बॅंकींग सुविधा देणारे असून तळमावले येथे एटीएम सुविधा सुरु करण्यात आली आहे. संस्थेच्या तळमावले, मलकापूर कराड, कोल्हापूर, कोपरखैराणे शाखेत गोदरेज लाॅकर सुविधा आहेत. तसेच मोठे लाॅकर स्वस्त वाजवी दरात उपलब्ध आहेत. सर्व शाखेतून पॅनकार्ड बनवण्याची सुविधा जनतेस देण्यात येत आहे. रविवार पेठ कराड, शेडगेवाडी, वाडी रत्नागिरी या शाखेत मिनीएटीएम सुविधा उपलब्ध आहेत.

सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी इंद्रजित कणसे, सुशांत तुपे, श्रीधर हावळे, विजय सवादकर, सागर टिळेकर, गिरीश टिळेकर, स्मिता देशमुख, सतीश शेडगे, प्रथमेश व्यवहारे, काजल इंगवले तसेच शिवसमर्थ परिवारातील सदस्यांनी विषेश परिश्रम घेतले.