श्री.बाळसिद्ध विद्यालय,घोगांव चे शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदीपक यश.


कराड/प्रतिनिधी : 

      ग्रामीण विकास शिक्षण संस्था उंडाळेचे,श्री.बाळसिद्ध विद्यालय,घोगांव या विद्यालयामधील इ.८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळविले.चि.तनिष्क अनिल पवार व चि.ओंकार महादेव साळुंखे हे दोन विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले .गुणवंत विद्यार्थी सत्कार ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक संचालक ॲड.श्री.आनंदराव पाटील उर्फ राजाभाऊ यांच्या हस्ते झाले.या बरोबरच एक विद्यार्थी चि.ओंकार हा NMMS शिष्यवृत्ती धारक झाला आहे.त्याच प्रमाणे एस्.एस्.सी.परीक्षेत ही चि.पंकज काटेकर हा विद्यार्थी ९६:००%गुण मिळवुन विद्यालयात प्रथम,येळगांव केंद्रात प्रथम आला आहे.ग्रामीण विकास शिक्षण संस्थेत प्रथम क्रमांकाचा मानकरी श्री.बाळसिद्ध विद्यालय,घोगांवचा चि.पंकज काटेकर हा ठरला.विद्यार्थी यशवंत होण्याची घोडदौड सुरु आहे. अल्प कालावधीत शाळेचे मुख्याध्यापक श्री.हणमंत सूर्यवंशी यांनी अल्प कालावधीत विद्यार्थी गुणवत्ते बरोबरच ग्रामस्थांच्या मदतीने डिजिटल वर्ग,रंगरंगोटी,खेळ साहित्य,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,वृक्षलागवड या सोबत योग्य नियोजन करुन एस्.एस्. सी परीक्षेतील व शिष्यवृत्ती परीक्षेत हे दैदिप्यमान यश संपादन केले आहे.

      मार्गदर्शक शिक्षक श्री.बालाजी मुंढे ,श्री.सचिन चव्हाण,श्री.गणेश तपासे,श्री.भालचंद्र आंबवडे,श्री.रविंद्र पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.या यशा बद्दल विद्यार्थी व शिक्षकांचे ग्रामिण विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.जयसिंगराव पाटील(बापू)सचिव श्री.बी.आर.यादव,संचालक श्री.शंकर हरी पाटील व सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले.तसेच संस्था निरिक्षक डॉ.श्री.आर.ए.कुंभार सर,श्री.व्ही.के.शेवाळे सर,श्री.एम .बी.पाटील सर यांनी ही फोनद्वारे अभिनंदन केले.

    सत्कार प्रसंगी प्राचार्य श्री.बी.पी.मिरजकर मुख्याध्यापक श्री.बी.आर.पाटील सर ,श्री.जगनाथ माळी,श्री.शंकर आंबवडे,सौ.शुभांगी पाटील,श्री.महादेव साळुंखे,श्री.अनिल पवार,महेंद्र आंबवडे,श्री.गुजले, श्री.महादेव कदम, भिमराव भोसले,हणमंत शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.