पुनर्वसन प्रक्रिया तातडीने सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू :मराठवाडी धरणग्रस्त

 

ढेबेवाडी/प्रतिनिधी :

95 % काम पुर्ण झालेल्या मराठवाडीचे शेकडो धरणग्रस्त गेल्या 23 वर्षासून पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत आहेत,जलाशयात घरे बुडणार म्हणून धरणग्रस्तांना तात्पुरत्या निवारा शेड मध्ये स्थलांतर करा अशा विनवण्या करणारे अधिकारी पावसाळा संपला तरी गायब आहेत,येत्या पंधरा दिवसांत बैठकीचे आयोजन करून प्रलंबित पुनर्वसन प्रक्रिया सुरू कराअशी मागणी वांग मराठवाडीच्या धरणग्रस्तांनी केली आहे.

             याबाबत जनजागर प्रतिष्ठान या धरणग्रस्त संघटनेच्या प्रतिनिधींनी सातारा जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की गेल्या वर्षभरापासून मराठवाडी प्रकल्पातील धरणग्रस्तांना न्याय मिळत नाही.प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले तरी पुनर्वसनाचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे. आणि यंत्रणेकडून जाणीवपूर्वक समस्येकडे दुर्लक्ष करीत आहेत अशी धरणग्रस्तांची भावना झालीआहे,आम्ही सर्वस्तरावर प्रयत्न व पाठपुरावा केला पणआम्हाला न्याय मिळत नाही,आणि जर धरणाचे काम पुन्हा सुरू झाले तर धरणग्रस्तांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होणार आहे.

      वरील बाबी लक्षात घेऊन आपण स्वतः याकामी लक्ष घालून बैठकीचे आयोजन करावे,व धरणग्रस्तांच्या समस्या सोडवण्यात याव्यात व जोपर्यंत धरणग्रस्तांचे 100 % पुनर्वसन होत नाही तोपर्यंत धरणाचे काम सुरू करण्यात येऊ नये.आमचात्याला विरोध असेल आणि तसे झाल्यास आम्ही धरणस्थळावर तिव्र आंदोलन करू असा इशाराही दिला आहे.सोबत धरणग्रस्तांच्या समस्याचे निवेदनही जोडले आहे.निवेदनावर जनजागरणचे राज्य संघटक देवराज देशमुख,धरण मुख्य संघटक जितेंद्र पाटील,सांगली जिल्हा समन्वयक जगन्नाथ विभुते, आनंदराव मोहिते,सुनिल पवार आदींच्या सह्या आहेत.

बेकायदा केलेल्या घळभरणीमुळे साठलेल्या जलाशयात बुडणाऱ्या घरातील धरणग्रस्तांनी प्रशासनाला सहकार्याची भुमिका घेत निवारा शेडमध्ये स्थलांतर केले मात्र आता धरणग्रस्त जागा सोडणार नाहीत तर पुनर्वसन झालेले स्थलांतरित परत येत जलाशयातील घरातच राहतील. 
   जगन्नाथ विभुते 
   जनजागर प्रतिष्ठान समन्वयक सांगली जिल्हा