31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर गृह राज्यमंत्र्यांनी सातारा शहराच्या कायदा व सुव्यवस्थेची केली पहाणी.

 


 सातारा दि.31 (जिमाका): कोरोना संसर्ग पसरु नये म्हणून शासनाने व जिल्हा प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुन नवीन वर्षाचे स्वागत घरात राहून करता यावे यासाठी नववर्षाच्या पूर्व संध्येला गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा शहरात विविध ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेची पहाणी केली. यावेळी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आदी सोबत होते.

          यावेळी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शहरातील पोवई नाका, मोती चौक, राजवाडा परिसर, बोगदा, बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथे पोलिस बंदोबस्ताची पाहणी केली. तेथील संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना अनुचित प्रकार घडू नये याबाबतच्या आवश्यक त्या सूचना केल्या. 

              यानंतर गृह राज्यमंत्री श्री. देसाई यांनी पोलीस मुख्यालयातून जिल्ह्यातील सर्व पोलीस यंत्रणेला वायरलेसवरून कायदा व सुव्यवस्था कडकपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. यावेळी राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सर्व पोलीस यंत्रणेला नववर्षाच्या शुभेच्छाही वायरलेसवरून दिल्या.

०००

Popular posts
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे फिरणारी ती पोस्ट चुकीची व खोटी
इमेज
साताऱ्यात राष्ट्रवादीला सुरुंग, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ शिवसेनेत दाखल.
इमेज
पाटण बाजार समितीच्या सभापतीपदी बाळकृष्ण पाटील तर उपसभापतीपदी विलास गोंडांबे यांची निवड.
इमेज
मान्याचीवाडी गावाने पटकावला पन्नास लाख रुपयांचा माझी वसुंधरा अभियान राज्यस्तरीय पुरस्कार.
इमेज
कुंभारगाव ग्रामपंचायती तर्फे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण.
इमेज