‘शिवसमर्थ’ च्या वतीने रक्तदान व प्लाझ्मा दान नावनोंदणी शिबीराचे आयोजन


‘शिवसमर्थ’ च्या वतीने रक्तदान व प्लाझ्मा दान नावनोंदणी शिबीराचे आयोजन


तळमावले/वार्ताहर


तळमावले (ता.पाटण) येथील शिवसमर्थ परिवार सामाजिक विकास संस्था, यांच्या वतीने भव्य रक्तदान व प्लाझ्मा दान नावनोंदणी शिबीराचे आयोजन गुरुवार दि.5 नोव्हेंबर, 2020 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 या वेळेत शिवसमर्थ भवन, कराड-ढेबेवाडी रोड, तळमावले, ता.पाटण, जि.सातारा. 02372-272444 या ठिकाणी करण्यात आले आहे. यासाठी दि शिवसमर्थ मल्टी.को.आॅप.क्रे.सोसा.लि;, शिवसमर्थ परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि महालक्ष्मी ब्लड बॅंक, कराड यांच्या विशेष सहकार्याने.सदर शिबीर आयोजित केले आहे.


आर्थिक सेवेबरोबर नेहमीच सामाजिक चळवळीत शिवसमर्थ परिवाराचे मोलाचे योगदान आहे. कोवीड-19 च्या काळात संस्थेने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड.जनार्दन बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 लाखाचा धनादेश दिला आहे. महिला बचत गटांकडून बनवलेले मास्क ग्रामीण भागातील वाडयावस्त्यांवर वाटले आहेत. पोलीसांना फेसशिल्ड वाटप, कोरोना प्रतिबंधासाठी व्हिडीओ क्लिप, पोलीस पाटील, पत्रकारांसाठी जीवनावश्यक कीट इ. गोष्टींच्या माध्यमातून संस्थेने कोरोना विरुध्दच्या लढयात सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर शिवसमर्थ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून 24 तास सेवा देण्याचाही प्रयत्न केला आहे.


सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीकोनातून सदरचे शिबीर राबवण्यात आले आहे. फिजिकल डिस्टनसह खबरदारीचे सर्व उपाय योजून सदर नियोजन केले आहे.


यामध्ये जास्तीत जास्त महिला व पुरुष यांनी सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड.जनार्दन बोत्रे यांनी केले आहे. रक्तदान व प्लाझ्मा दान नावनोंदणी साठी हेमंत तुपे 97650 54137, सुशांत तुपे 95959 65000, इंद्रजित कणसे 9552640455, शिवसमर्थ मुख्य कार्यालय तळमावले मो. 7083780444 या क्रमांकावरती संपर्क सा धावा.