पदवीधर व शिक्षक मतदार मेळावा तळमावले येथे संपन्न

 


तळमावले / प्रतिनिधी : 

वांगव्हॅली सभागृह तळमावले येथे भरतजी पाटील प्रदेश कार्यकारीणी सदस्य यांचे अध्यक्षतेखाली व विक्रमबाबा पाटणकर ,कविता कचरे, रामभाऊ लाहोटी ,फत्तेसिंह पाटणकर , रवींद्र मिसाल, भरत कदम यांचे उपस्थित पार पडला .

महाविकास आघाडीमध्ये जरी तिघांचे संख्याबळ असले तरी भाजपचाच उमेदवार नेहमीप्रमाणे निवडणूक जिंकणार हे अटळ सत्य आहे. पदवीधर व शिक्षक मतदार हे सुज्ञ असल्याने संध्याची राजकीय परिस्थितीचा निश्चितच फायदा हा भारतीय जनता पार्टीच्याच उमेदवारांना होईल. प्रत्येक क्षेत्रामध्ये जनतेची होणारी पिळवणूक व तिघाडी विषयी राग व्यक्त करण्यासाठीच शिक्षक पदवीधरचे मतदान हे भाजपाच्याच पारड्यात पडून निश्चितच आपले उमेदवार निवडून येतील असा विश्वास मा.भरतजी पाटील यांनी मतदारांच्या मनामध्ये निर्माण केला. सातत्याने पाटण तालुक्यातून मताधिक्य हे भाजपाच्या उमेदवारास मिळत आले. यावर्षीही त्या मध्ये वाढ व्हावी ही अपेक्षा व्यक्त केली. 

      विक्रमबाबा पाटणकर यांनी संग्राम देशमुख यांना पदवीधरांची पसंती असून त्यांचे सामाजिक , राजकीय कार्याचा खुलासा पदविधरांसमोर केला. तरूण तडफदार नेतृत्व हे निश्चितच पदविधरांसाठी फायद्याचे ठरेल असे मांडले. 

        रामभाऊ लाहोटी यांनी मतदान प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली.

          कविता कचरे यांनी प्रास्ताविक व आभार मानले. 

         या प्रसंगी विविध शाळांचे मुख्याध्यापक, साबळे सर ,शिंदे सर, सौ यादव मैडम ,लोहार सर, नलवडे सर ,यादव सर शिक्षक व पदवीधर मोठ्या संख्येने उपस्थित होते.