खा.श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते शिवसमर्थ दिवाळी अंकाचे प्रकाषन.

 

तळमावले/वार्ताहर :

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते साप्ताहिक शिवसमर्थ च्या 12 व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन दिमाखदारपणे पार पडले. यावेळी अंकांचे उपसंपादक डाॅ.संदीप डाकवे, प्राचार्य सुनील ढेंबरे सर, जीवन काटेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 11 वर्षे दर्जेदार दिवाळी अंक प्रकाशित केला जात आहे. या दिवाळी अंकांत नामवंत साहित्यिकांबरोबरच नवोदित लेखक कवी यांच्या साहित्याचाही समावेश केला जातो. आर्थिक सेवा देत असताना साहित्यिक चळवळीत शिवसमर्थ संस्था व परिवार योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे.

यापूर्वी शिवसमर्थ च्या प्रथम दिवाळी अंकातील कथा इ.6 वी च्या बालभारतीच्या अभ्यासक्रमात घेतली आहे. सन 2010 मध्ये दिवाळी अंकावर दै.नवाकाळ मध्ये प्रथम पानावर अग्रलेख छापून आला होता. सन 2011 रोजी अक्षररंग यांच्या वतीने दिवाळी अंकाला राज्यस्तरीय दिवाळी अंक पुरस्कार मिळाला आहे. सन 2012 ते 2015 या कालावधीत आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेच्यावतीने उत्कृष्ट मांडणी पुरस्कार मिळाला आहे. तर गतवर्षी मराठी वृत्तपत्रलेखक संघाचा उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्काराने शिवसमर्थ अंकाचा गौरव झाला आहे.

साप्ताहिकाच्या माध्यमातून विभागातील समस्या, अडचणी शासनासमोर मांडण्याचे काम केले जात आहे. अशा या दर्जेदार दिवाळी अंकाचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी कौतुक करत भावी वाटचालीस षुभेच्छा दिल्या आहेत.