पाटण तालुका पत्रकार संघामार्फत ढेबेवाडी विभागातील कोरोना योध्यांचा सन्मान.

कोरोना योद्धे योगेश पाटणकर यांना सन्मानपत्र देताना पत्रकार विठ्ठल चव्हाण, जयभिम कांबळे, रविंद्र माने, नितीन कचरे आदी मान्यवर. 

तळमावले/प्रतिनीधी :

 तळमावले  येथील राजे संघर्ष प्रतिष्ठान कार्यलयात पाटण तालुका पत्रकार संघामार्फत कोरोना योद्धा सन्मानपत्र वितरण सोहळा नुकताच पार पडला. पाटण तालुका पत्रकार संघाने तालुक्यातील ज्या ज्या लोकांनी कोरोना कालावधीत उत्तम रित्या कार्य करून कोरोनला रोखण्यासाठी मदत केली त्याचबरोवर कोरोना विषयी  जागृती केले अशा कोरोना योध्याचा सन्मान करण्यासाठी पुढाकार घेतला याच पार्श्वभूमीवर ढेबेवाडी विभागातील सदस्यांनी पुढाकार घेऊन विभागातील कोरोना योध्याचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

             यामध्ये शिवसमर्थ पतसंस्थेचे संस्थापक अॅड.जनार्दन बोत्रे, राजे संघर्ष प्रतिष्ठान चे संस्थापक समाजसेवक योगेश पाटणकर, समाजसेविका सौ.कवितेताई कचरे, ढेबेवाडी पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, कराड येथील नामांकित डॉक्टर अजिंक्य बहुलेकर, सनबुर चे सरपंच संदीप जाधव, मंदृल कोळे चे सरपंच अमोल पाटील., आशासेविका सविता देसाई, आशासेविका नीता सांवत, मंडल अधिकारी प्रवीण शिंदे, तळमावले येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.उमेश गोंजारी या कोरोना योध्याचा   सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

            यावेळी सर्व कोरोना योध्यांनी आपापले मनोगत व्यक्त करताना त्यांना कोरोना काळात आलेले अनुभव सर्वापुढे मांडले. राजे संघर्ष प्रतिष्ठान चे सर्वेसर्वा समाजसेवक/उद्योजक योगेश पाटणकर यांनी मार्गदर्शन केले. कोरोना योध्याना लागणारी कोणत्याही प्रकारची मदत करण्यासाठी मी तयार आहे असे प्रतिपादन करून कोरोना योध्याचे मनोबल वाढवले, जेष्ठ पत्रकार विठ्ठल चव्हाण यांनी तालुका पत्रकर संघाच्या विविध उपक्रमाची माहिती देऊन येणाऱ्या काळात सर्वांनी सतर्क राहूंन कोरोनाचा नायनाट करण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले

               रविंद्र माने यांनी प्रास्तविक व सुत्रसंचलन केले, पत्रकार संघ ढेबेवाडी विभाग प्रमुख जयभिम कांबळे यांनी मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमावेळी पत्रकार विठ्ठल चव्हाण,नितीन कचरे , तसेच रमेश नावडकर, सविता कांबळे, प्रकाश सागवकर, ज्योती माने आदी मान्यवर सहित कोरोना योद्धे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.