आनंदराव चव्हाण पतसंस्थेने १०० कोटी व्यवसाचा टप्पा ओलांडला

 


ढेबेवाडी : आनंदराव चव्हाण पतसंस्थेच्या वतीने सभासदांना वाहन वितरण करताना व्यवस्थापक सुहास पाटील, व सभासद.


ढेबेवाडी / प्रतिनिधी : 

स्वच्छ व पारदर्शी कारभारांने सभासद आणि ठेवीदारांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या आनंदराव चव्हाण पतसंस्थेने 55 कोटीवर ठेवीचा आणि 100 कोटीवर व्यवसायाचा टप्पा पार केला आहे.हे सभासद,ठेवीदार, संचालक आणि कर्मचाऱ्यांच्या सामुहिक विश्वासाचे यश आहे असे प्रतिपादन पतसंस्थेचे व्यवस्थापक सुहास पाटील यांनी केले.                  

                आनंदराव चव्हाण पतसंस्थेच्या ढेबेवाडी ता.पाटण शाखेच्या वतीने चार सभासदाना दुचाकी  वाहनांचे वितरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. कार्यालय प्रमुख आनंद कांबळे, शाखाप्रमुख दादासो जाधव,विकास पाटील, संजय काळुगडे,सुरेश ढेब,सचिन देसाई,शिवाजी सुपूगडे,मेघराज धस,कुणाल हजारे,मेघराज धस,भगवंत यादव,विलास पाटील,आदींची उपस्थिती होती.

               यावेळी पतसंस्थे मार्फत चार सभासदांना भानुदास यादव,सुदाम देसाई  व व्यवस्थापक सुहासचंद्र पाटील यांचे हस्ते  वहानांचे  वितरण करण्यात आले 

     यावेळी बोलताना सुहास पाटील म्हणाले आनंदराव चव्हाण पतसंस्थेने चालूवर्षी रू.100 कोटी व्यवसाचा टप्पाओलांडला  असून संस्थेकडे  57 कोटी 83 लाख ठेवी आणि  46 कोटी  10 लाख एवढे  कर्ज वितरण करण्यात आले आहे. संस्थापक हिंदुराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व चेअरमन अभिजीत पाटील यांच्या व्यवस्थापना खाली संस्थेची दमदार  प्रगतीकडे वाटचाल सुरूआहे.गेल्या 26 वर्षात संस्थेने  सभासदांचा  विश्वास संपादन करून  आपला वेगळा  ठसा उमटवला आहे.