कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुंभारगाव येथील त्रिपुरी पौर्णिमेची यात्रा रद्द.

 


कुंभारगाव / प्रतिनिधी : राजेंद्र पुजारी 

            कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी कुंभारगाव ता पाटण येथील त्रिपुरी पौर्णिमा दि. 1/12/2020 रोजी श्री लक्ष्मी अंबाबाई देवी यात्रेचा मुख्य दिवसाचा उत्सव असतो तो रद्द करण्यात आला असून भाविक भक्त, नागरिकांनी मंदिर परिसरात देवदर्शनासाठी गर्दी करू नये, सर्व नागरिकांनी मास्कचा वापर करावा, अन्यथा ग्रामपंचायती मार्फत, 1000/-दंड आकारण्यात येणार आहे.

  ग्रामपंचायत कार्यालयात ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे स.पो.नि. उत्तमराव भजनावळे, पोलीस उप.नि. विजय पाटील, नवनाथ कुंभार,  यांनी यात्रे संबधी योग्य त्या सूचना ग्रामस्थांना दिल्या, परिसरातील भाविक , नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमाचे काटेकोर पालन करावे व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी  कुंभारगाव ग्रामपंचायतीचे माजी उप सरपंच राजेंद्र पाटील, तुकाराम पुजारी, संजय गुरव, दिलीप देसाई, शामसुंदर स्वामी, अजित डांगे, अन्वर डांगे, शंकर मोहिरे, सचिन चव्हाण, दादा झेंडे उपस्थित होते. 

Popular posts
लग्न समांरभासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केले सुधारीत आदेश जारी
इमेज
पृथ्वीराज चव्हाण यांना भाजपविरुद्ध लढण्यासाठी दिल्लीतून दिली मोठी जबाबदारी.
इमेज
शेंडेवाडी येथील दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह. जनतेने काळजी घेण्याचे डॉक्टरांचे आवाहन.
इमेज
कोरोना संक्रमिक रुग्ण संख्येवर नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी यांचे खाजगी डॉक्टर्स आणि हॉस्पिटलला आदेश
इमेज
सातारा जिल्ह्यात 195 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित तर 2 बाधिताचा मृत्यु
इमेज