शिवसमर्थच्या रक्तदान शिबीराला उस्फूर्त प्रतिसाद...


छाया : अनिल देसाई. 


रक्तदान केल्यानंतर ब्लड बँकेकडून प्रमाणपत्र स्वीकारताना सौ रेश्मा डाकवे व डॉ संदीप डाकवे. 


 


शिवसमर्थच्या रक्तदान शिबीराला उस्फूर्त प्रतिसाद...


तळमावले/प्रतिनीधी


शिवसमर्थ परिवार सामाजिक विकास संस्था, दि शिवसमर्थ मल्टीस्टेट को-आॅप.क्रेडीट सोसायटी लि.तळमावले यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महालक्ष्मी ब्लड बॅंक कराड यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.सोशल डिस्टन्स,मास्क व शासनाच्या इतर नियमांचे पालन करत हे रक्तदान शिबीर पार पडले.आर्थिक सेवा देत असताना सामाजिक बांधिलकीचे भान असणारे अनेक उपक्रम शिवसमर्थने राबवले आहेत.रक्तदान शिबीर राबवून एक नवा मानदंड संस्थेने निभाविला आहे.तळमावले येथे संस्थेच्या प्रांगणात रक्तदान शिबीर पार पडले.


प्रारंभी शिवसमर्थ प्रतिमेचे पुजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर महालक्ष्मी ब्लड बॅंकेतील कर्मचाऱ्यांचा सत्कार शाल व पुस्तक देवून करण्यात आला.


याप्रसंगी संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष अॅड.जनार्दन लक्ष्मण बोत्रे,शिवाजी सुर्वे,उपमहाव्यवस्थापक हेमंत तुपे,संदीप डाकवे,इंद्रजित कणसे,सुशांत तुपे,वीणा ढापरे,राजेंद्र भोसले,पवन नालगे,प्रभाकर वाघमारे व इतर मान्यवर उपस्थित होते.


विशेष म्हणजे विभागातील अनेक महिलांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसमर्थ परिवारातील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.रक्तदान करणाऱ्या सर्व दात्यांना शिवसमर्थ संस्थेकडून व ब्लड बॅंकेकडून मास्क व प्रमाणपत्र देण्यात आले.