श्री संतकृपा शिक्षण संस्था घोगावच्या डिप्लोमा इन फार्मसीची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम  


श्री संतकृपा शिक्षण संस्था घोगावच्या डिप्लोमा इन फार्मसीची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम . 


कराड / प्रतिनिधी 


महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२० पदविका औषधनिर्माणशास्त्र [ डी.फार्मसी ] द्वितीय वर्षाचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ फार्मसी [ डी. फार्मसी ] घोगाव ता.कराड. जि.सातारा या महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला असून यावर्षीही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. 


त्यामध्ये आनंद धुमाळ याने ९८.०० टक्के गुण संपादन करून प्रथम क्रमांक, पूजा कारंडे हिने ९७.५० टक्के गुणासह द्वितीय क्रमांक तर मुस्कान देसाई हिने ९७.४० टक्के गुणासह तृतीय क्रमांक पटकावला. 


सर्व यशस्वी विध्यार्थ्याचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष श्री शशिकांत पाटील, उपाध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव श्री प्रसून जोहरी, संचालक श्री सागर पाटील प्राचार्या वैशाली महाडीक सर्व शिक्षक व शिक्षेकतर कर्मचारी यांनी केले.


Popular posts
शेंडेवाडी येथील दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह. जनतेने काळजी घेण्याचे डॉक्टरांचे आवाहन.
इमेज
कोरोना संक्रमिक रुग्ण संख्येवर नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी यांचे खाजगी डॉक्टर्स आणि हॉस्पिटलला आदेश
इमेज
सातारा जिल्ह्यात 182 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु
इमेज
मान्याचीवाडी ला "तालुका सुंदर गांव" पुरस्कार जाहीर.
इमेज
सातारा जिल्ह्यात महामार्ग वगळता रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी, जिल्ह्यातील शाळा मात्र सुरु राहणार .
इमेज