स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब)यांची 77 वी जयंती साध्यापध्दतीने साजरी. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंची प्रमुख उपस्थिती

दौलतनगर दि.21 :लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा 77 वा जयंती सोहळा लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने दौलतनगर ता.पाटण येथे स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे पुर्णाकृती पुतळयासमोर राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवानेते यशराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत कोरोनाच्या संकटामुळे अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला.

               दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा जयंती सोहळा प्रतिवर्षी कारखाना कार्यस्थळावर साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षी स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा 77 वा जयंती सोहळा कोरोनाच्या संकटामुळे अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. जयंती सोहळयानिमित्त राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते कारखाना कार्यस्थळावरील स्व.शिवाजीराव देसाई यांचे पुर्णाकृती पुतळयास,समाधीस पुष्पचक्र व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.प्रतिवर्षाप्रमाणे स्व.(आबासाहेब) यांचे प्रतिमेसमोर भजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते व हितचिंतक यांची उपस्थिती होती.

Popular posts
मंत्री शंभूराज देसाई यांची उद्या दौलतनगर येथे सभा. शक्ती प्रदर्शनाकडे जिल्ह्याचे लक्ष
इमेज
"आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव" पुरस्काराने मान्याचीवाडीचा गौरव ; मान्याचीवाडी ठरले जिल्हयातील स्मार्टग्राम.
इमेज
विनायक मेटे यांचा कार अपघातात अकाली मृत्यू! मराठा आरक्षण आंदोलनाचा आवाज हरपला
इमेज
कुंभारगाव ग्रामपंचायत मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. सरपंच सौ. सारिका पाटणकर यांचे शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न.
इमेज
कुंभारगाव येथे "हर घर तिरंगा "रॅली संपन्न.
इमेज