पत्रकार हरीष पाटणे यांना डाॅ. संदीप डाकवे यांचेकडून 6000 वे स्केच भेट

 


तळमावले / प्रतिनिधी :

शालेय वयापासून चित्रकलेचा छंद जोपासलेल्या अष्टपैलू चित्रकार, पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी आजपर्यंत अनेक दिग्गज व्यक्तिांना त्यांची व्यक्तिचित्रे, शब्दचित्रे, अक्षरचित्रे, अक्षरगणेशा चित्रे भेट दिली आहेत. सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष व दै.पुढारीचे वृत्तसंपादक हरीष पाटणे यांना त्यांनी दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर नुकतेच त्यांचे रेखाचित्र दिले. त्यांनी भेट दिलेले हे 6000 वे रेखाचित्र आहे. एका पत्रकाराकडून दुसÚया पत्रकाराला दिलेली ही आगळीवेगळी भेट आहे असेच मानावे लागेल.

चित्रकलेचा छंद जोपासत डाॅ.संदीप डाकवे यांनी कलेच्या माध्यमातून गरजूंना लाखो रुपयांची मदत करत सामाजिक बांधिलकीही जपली आहे. अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांना डाॅ.डाकवे यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून आपल्या मोहात पाडले आहे. सामाजिक, राजकीय, अध्यात्मिक, प्रशासकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांकडे डाॅ.संदीप यांची कला पोहोचली आहे. याशिवाय अनेक सेलिब्रिटींनीही त्यांच्या कलेचे तोंड भरुन कौतुक केले आहे.

अग्रलेखांचे बादशहा पद्मश्री नीलकंठ खाडीलकर (भाऊ) यांची तब्बल 83 रेखाचित्रे, गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या 54 भावमुद्रा साकारत रेखाटनामधील वेगळेपण जपले आहे. भारतीय बनावटीचे पहिले विमान बनवणारे कॅप्टन अमोल यादव, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, शिवव्याख्याते नितीन बानुगडे-पाटील, इंद्रजित देशमुख, अपर्णाताई रामतीर्थकर, कर्नल हितेश चोरगे यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गज व नामवंत सेलिबिटी यांना त्यांची रेखाचित्रे डाॅ.संदीप डाकवे यांनी भेट दिली आहेत.

ठिपक्यातून- नावातून-शब्दातून-अक्षरातून चित्रे, मोरपिसावर संत तुकाराम, खडूतून अष्टविनायक, जाळीदार पिंपळपानावर श्रीगणेश, पोट्रेट रांगोळी, पेपर कटींग आर्ट, अक्षरगणेश, बोलक्या भिंती, वारीचे मोठे पोस्टर, भिंतीवर वारीचे चित्र, एक दिवा जवानांसाठी चित्र, थर्मोकोल अक्षर कटींग, आपटयाच्या पानातून शुभेच्छा संदेश, छत्रीवर-मास्कवर समाजप्रबोधनपर संदेश, फलकलेखन, मोठी भित्तीपत्रिका, हस्तलिखिते अशा कलेच्या विविध माध्यमातून काम करत त्यांनी आपले वेगळेपण नेहमी जपले आहे.

नुकतेच त्यांनी सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांना त्यांचे स्केच दिले त्यांनी दिलेले हे 6000 वे स्केच आहे. हरीष पाटणे यांनी देखील डाॅ.संदीप डाकवे यांच्या या उपक्रमाचे, राबवत असलेल्या कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


आता लक्ष लिम्का बुक ऑफ रेकाॅर्ड व गिनीज बुक ऑफ रेकाॅर्ड : डाॅ.संदीप डाकवे

100 वे चित्र अभिनेते भरत जाधव, 200 वे चित्र अनाथांची माय सिंधूताई सपकाळ, 300 वे चित्र खासदार श्रीनिवास पाटील,  500 वे चित्र उपमुख्यमंत्री स्व.आर.आर.पाटील, 1000 वे चित्र समाजसेवक डाॅ.प्रकाश आमटे, 2000 वे चित्र अभिनेते सुबोध भावे, 3000 वे चित्र महंत स्वामी आबानंदगिरीजी महाराज, 5000 वे चित्र पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते तर 6000 वे चित्र हरीष पाटणे यांना दिले आहे. चित्रे भेट दिलेल्या उपक्रमांची नोंद इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड मध्ये दोनदा तर हायरेेंज बुक ऑफ रेकाॅर्ड मध्ये एकदा झाली आहे. भविष्यात लिम्का बुक ऑफ रेकाॅर्ड व गिनीज बुक ऑफ रेकाॅर्ड मध्ये या उपक्रमाची नोंद होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे चित्रकार व पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी सांगितले आहे.