डाॅ.संदीप डाकवे यांनी रेखाटल्या गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या 54 भावमुद्रा


डाॅ.संदीप डाकवे यांनी रेखाटल्या गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या 54 भावमुद्रा


तळमावले/वार्ताहर


पाटण तालुक्यातील डाकेवाडी काळगांव येथील युवा चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या तब्बल 54 विविध भावमुद्रा रेखाटून त्यांना वाढदिवसाची अनोखी भेट दिली आहे. यंदा कोविड-19 च्या पाश्र्वभूमीवर ना.देसाई हे वाढदिवस साजरा करणार नाहीत. परंतू त्यांच्यावर प्रेम करणारे डाॅ.संदीप डाकवे यांनी त्यांची विविध भावमुद्रा रेखाटून त्याचे प्रदर्शन भरवणार असल्याचा मानस व्यक्त केला आहे. याची नोंद इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड कडे होण्यासाठी डाॅ.डाकवे यांनी पत्रव्यवहार देखील केला आहे.


पाटण तालुक्याचे ना.शंभूराज देसाई यांचेकडे गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन महाराष्ट्र राज्य अशी राज्याची 5 खाती आणि वासिम जिल्हयाचे पालकमंत्री पद आहे. इतका मोठा व्याप असताना देखील ते मतदारसंघात कायम कार्यरत असतात. कोविड-19 व पुरस्थितीत त्यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. ना.शंभूराज देसाई यांचा जनसंपर्क दांडगा आहे. मतदारसंघ व त्याबाहेर ही ते लोकांच्या सुख दुःखात आवर्जून उपस्थित राहतात. त्यामुळेच डाॅ.संदीप डाकवे यांनी त्यांच्या वाढदिनी अनोखा उपक्रम राबवला आहे.


डाॅ.डाकवे प्रत्येक वर्षी ना.शंभूराज देसाई यांना कलात्मक भेट देत असतात. यंदा त्यांच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त 54 चित्रे रेखाटण्याचा संकल्प त्यांनी केला आणि तो तडीस देखील नेला आहे. डाॅ.संदीप डाकवे यांच्या अनेक उपक्रमांसाठी ना.देसाई उपस्थित राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्याप्रती असणारा आदर आणखीनच दुणावला आहे. त्यामुळे त्यांनी या वाढदिवशी 54 चित्रांची भेट देण्याचा मानस व्यक्त केला आहे.


सदर चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात येणार असून 54 चित्रांच्या फोटोची फ्रेम करुन ती 54 बाय 54 सेमी आकारामध्ये करुन ती ना.शंभूराज देसाई यांना देण्यात येणार आहे. डाॅ.संदीप डाकवे यांनी राबवलेल्या प्रत्येक उपक्रमाचे ना.देसाई यांच्याकडून कौतुक झाले आहे. यापूर्वी संदीप डाकवे यांच्या उपक्रमांची नोंद इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड या पुस्तकात दोनदा तर हायरेंज बुक आॅफ वल्र्ड रेकाॅर्ड या पुस्तकात झाली असल्याने त्यांच्या नावाची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली आहे. नेहमीच विविध उपक्रम राबवत असलेल्या संदीप डाकवे यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.