बनपुरी गावच्या शिरपेचात एक मानाचा तुरा विमाग्राम बनपुरी पुरस्कार प्राप्त.


बनपुरी गावच्या शिरपेचात एक मानाचा तुरा विमाग्राम बनपुरी पुरस्कार प्राप्त


 सणबूर / प्रतिनिधी:


भारतीय आयुर्विमा महामंडळसातारा विभाग -कराड शाखा (943)विमाग्राम योजने अंतर्गत ग्रामस्थांच्या सहकार्याने विमाग्राम योजनेचा 75,000/-चा सन 2019-2020चा पुरस्कार प्राप्त झाला व त्यासाठीचा नामकरण फलक अनावरन कार्यक्रम बनपुरी स्टॉप या ठिकाणी पार पडला.


                यावेळी बनपुरी गावच्या सरपंच सौ.नर्मदा कुंभार, उपसरपंच डॉ.शिवाजीराव पवार, ग्रामसेवक जाधवर, विमा प्रतिनिधी विश्वनाथ पाटील, पोलिस पाटील दत्तात्रय कुंभार, शिवाजीराव मोकाशी मा.उपसरपंच,अशोक पाटील (सर),विनायक लटके (सर),पत्रकार प्रमोद पाटील,जानुगडे (गुरुजी) सुर्यकांत मोकाशी (गुरुजी),शरद पाटील (गुरुजी),मनोज पाटील,डॉ गणेश पवार युवक ग्रामस्थ उपस्थित होते


         यावेळी विमा प्रतिनिधी विश्वनाथ पाटील यांच्या बनपुरी ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला उपसरपंच शिवाजीराव पवार यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व प्रमोद पाटील यांनी आभार मानले.