.


 


कुंभारगाव | राजेंद्र पुजारी :


कोरोनाने सर्व शाळा बंद झाल्या आता काय करायच शिक्षक आपल्या दारी या उपक्रमांतर्गत गुरुवर्य लालासाहेब पाटणकर विद्यालय, बोपोली- शिवंदेश्वर , ता. पाटण, जि. सातारा या विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. जयवंत शामराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली व विद्यालयाचे उपशिक्षक श्री. विनोद अशोक चव्हाण आणि श्री. सूर्यकांत सीताराम पुजारी यांच्या सहकार्याने विद्यालयाच्या अंतर्गत असणाऱ्या घाटमाथा (पवार वस्ती, केमसे, कुसवडे, धावडवस्ती), ढाणकल (कदम वस्ती), बोपोली, (किसरुळे), देशपांडेवाडी, हेळवाक या गावातील विद्यार्थ्यांना त्याच्या घरी जाऊन तसेच काही विद्यार्थ्यांना हनुमान मंदिरात जमा करून आजपर्यंत केलेल्या अभ्यासाची तपासणी केली.


तसेच कोयना शिक्षण संस्था, पाटण यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या स्वाध्यायाचे वितरण करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आपला सहभाग अत्यंत चांगला नोदविला. दिलेला अभ्यास पूर्ण करण्यात आला असल्याचे दिसून आले. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केला नाही त्यांना तो पूर्ण करण्यास सांगण्यात आले


तसेच सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या उपक्रमाचे स्वागत व कौतुक केले आहे.या उपक्रमाचे कोयना शिक्षण संस्था,पाटण चे अध्यक्ष मा. सोपानराव चव्हाण (काका),उपाध्यक्ष मा. प्रकाशभाऊ पाटील, सचिव मा. श्रीमंत अमरसिंह पाटणकर, सहसचिव मा. बाळासाहेब पाटील तसेच सदस्य,J मा.संजीवदादा चव्हाण , मा.याज्ञसेन पाटणकर तसेच सर्व सदस्य, पालक ग्रामस्थ इत्यादीनी शिक्षकाचे अभिनंदन केले.