कुंभारगाव येथे "माझे कुटुंब माझी जबाबदारी" या मोहिमेची पहिली फेरी पूर्ण दुसऱ्या फेरीस सुरुवात


 (छाया :अनिल देसाई ) 


कुंभारगाव येथे "माझे कुटुंब माझी जबाबदारी" या मोहिमेची पहिली फेरी पूर्ण दुसऱ्या फेरीस सुरुवात


कुंभारगाव | राजेंद्र पुजारी 


 कुंभारगाव ता पाटण येथे महाराष्ट्र शासनाच्या माझे कुटूंब माझी जबाबदारी उपक्रम चागंल्या पद्धतीने राबवत असल्याचे दिसून येत आहेे. लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाचा संंसर्ग रोखण्यासाठी  प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, घरोघरी  भेटी देऊन नागरिकांची थर्मामिटरने- आँक्सीमीटरने तपासणी करून आरोग्या बाबत पूर्ण माहिती संकलित करत असून ग्रामस्थांना कोरोनावर मात करण्यासाठी काळजी घेण्याच्या सूचना करत आहेत. 


या मोहिमेची पहिली फेरी दि 9/10/2020 रोजी पूर्ण झाली. व दि.16/10/2020, रोजी दुसरी फेरी चालू झाली असून प्रत्येक नागरिकांची आरोग्या बाबतची माहिती घेऊन आरोग्य विभागास देण्यात येत आहे. त्या मुळे कोरोना रोखण्यास मदत होईल.


नागरिकांनी या तपासणी मोहिमेस सहकार्य करून आरोग्या बाबत माहिती न लपवता पूर्ण खरी माहिती दयावी,त्यांना योग्य उपचार करण्यात येतील, तसेच घराच्या बाहेर जाताना मास्कचा वापर करा, सॅनिटायझर वापर करा, सुरक्षित अंतर ठेवा. अशी विनंती  आरोग्य तपासणी कर्मचारी यांचे कडून करण्यात येत आहे 


 आरोग्य तपासणी मोहीमेत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका श्रीमती ए एम कांबळे, आशा सेविका सुनीता सुतार, श्रीमती संगीता कांबळे. अंगणवाडी सेविका आरती सागावकर,  मधुमती बुरसे, सुरेखा माने,  वैशाली कचरे,  कोमल कारंडे व पल्लवी शेटे. या उपस्थित होत्या .