‘धसका’ शाॅर्टफिल्म करतेय कोरोनाविषयक जनजागृती


शाॅर्ट फिल्म मधील एक दृश्य. 


‘धसका’ शाॅर्टफिल्म करतेय कोरोनाविषयक जनजागृती


तळमावले/वार्ताहर


कुंभारगांव येथील श्री.अनिल देसाई व त्यांचे सहकारी यांनी कोरोनाविषयी जनजागृती करणारी 5 मिनिटांची शाॅर्टफिल्म तयार केली आहे. सध्या सोशल मिडीयावर या शाॅर्टफिल्म ची चर्चा चांगलीच रंगत आहे. कोरोनाविषयक जनजागृती करण्याचे, कोरोनाची अनाठायी भिती लोकांच्या मनातून काढण्याचे काम ही शाॅर्टफिल्म करत आहे. शासनाच्या माझे कुटूंब माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत जनजागृती करण्यासाठी ही शाॅर्टफिल्म तयार केली आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी स्वतःची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या शाॅर्टफिल्म मध्ये रोगाची काळजी न करता स्वतःची काळजी घेतल्यास काही होत नाही असे दर्शवण्यात आले आहे. या शाॅर्टफिल्म चे लेखन दिलीपराज चव्हाण यांनी केले आहे. तसेच अनिल देसाई, अशोक मोरे, महेश चाळके व पोपट चाळके यांनी कलावंत म्हणून काम केले आहे. तर कॅमेरामन म्हणून शंभूराज अनिल देसाई, युवराज लोटळे यांनी काम पाहिले आहे. या फिल्मसाठी ग्रामपंचायत कुंभारगांव, प्राथमिक आरोग्य केंद्र तळमावले यांचे तसेच दै.कृष्णाकाठ चे संपादक चंद्रकांत चव्हाण, डाॅ.दिलीपराव चव्हाण, माजी जि.प.सदस्य संजय देसाई, डाॅ.उमेश गोंजारी, प्रा.रमेश गुरव, राजेंद्र पुजारी, डाॅ.संदीप डाकवे यांचे सहकार्य लाभले आहे.


कोणताही अनुभव नसताना केवळ छंद म्हणून त्यांनी या शाॅर्टफिल्म निर्मिती केली आहे. हे विशेष आहे. यापूर्वी कोरोनाच्या काळात अनिल देसाई यांच्या पत्नी सौ.सुवर्णा देसाई यांनी शिलाई मशीनवर मास्क शिवून ते गरजू लोकांना वितरित केले आहे. यावेळी संपूर्ण कुटूंबाने त्यांना मदत केली आहे. त्यांच्या या कामाची दखल घेवून त्यांना विविध संस्था आणि संघटनांनी कोरोना योध्दा सन्मानपत्र देवून गौरवले आहे.


अनिल देसाई हे व्यवसायाने फोटोग्राफर आहेत. त्यांना कलावंताविषयी विशेष आदर आहे. त्यांनी विविध मालिकांच्या सेटवर जावून अनेक नामवंत कलावंतांना भेटी


घेतल्या आहेत. यामुळे आपणही काहीतरी करावे अशी इच्छा त्यांच्या मनात बरेच दिवस होती. ती इच्छा त्यांनी या शाॅर्टफिल्म च्या माध्यमातून पूर्ण केली आहे. त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद पण मिळत आहे. भविष्यात समाजासाठी काहीतरी करण्याचा मनोदय अनिल देसाई यांनी केला आहे.


 


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


जनतेसाठी नेहमी कार्यरत असणारे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी या शाॅर्टफिल्म बद्दल समाधान व्यक्त केले आहे. तसेच शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे यांनीही अनिल देसाई यांचे अभिनंदन केले आहे.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖