ढेबेवाडी वांग नदीजवळ अपूर्ण रस्त्याचे काम देतंय अपघाताला आमंत्रण.


ढेबेवाडी वांग नदीजवळ अपूर्ण रस्त्याचे काम देतंय अपघाताला आमंत्रण. 


ढेबेवाडी(वार्ताहर) :


  कराड ढेबेवाडी रोडवरील ढेबेवाडी वांग नदीजवळ अपूर्ण रस्त्याचे काम देतंय अपघाताला आमंत्रण. 


       कराड ढेबेवाडी रोड वरील वांग नदीवरील पुला नजीक गेल्या वर्षी पावसाळ्यात रस्ता खचला होता. 


परंतु काही दिवसांनी खचलेल्या रस्त्याचे भरावा करून काम पूर्ण केले परंतु रस्त्याचे काही अर्धवट काम राहिले असून रस्त्यावरील अर्धवट डांबरी रस्ता व अर्धा कच्चा रस्ता तसेच त्यावरीती गवत उगवले असल्याने वाहचालक ,दोन चाकी चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. 


त्यामुळे या रस्त्यावर अपघात होत असून राहिलेलं काम पूर्ण करून त्यावर खडी व डांबर टाकून राहिलेला रस्ता पक्का करण्यात यावा अशी मागणी वाहनचालक व नागरिकामधून केली जात आहे.  तरी याकडे संबंधित विभागाने लक्ष घालून ते पूर्ण करण्यात यावे व होणारे अपघात टाळावे.