अजून एक निर्भया.

 


अजून एक निर्भया... 


"अनादी काळापासूनच तुझी जीभ छाटली...


बोलली असती म्हणून तू...!!


"लक्ष्मणरेषा" आखून दिली होती...


नजरेस कोणाच्या पडशील म्हणून तू...!!


तुझे आज मणके तुटले...समजले ग सगळ्यांना...


पण रोजच चारभिंती मध्ये "ती" तुटत असतेच की..!!


फक्त "वाच्यता" होत नाही.. अन झाली तर...


आहेत मग..कायद्याच्या पळवाटा....!!


उठतात मग इथे थोडावेळ त्या "आरोळ्या"...


तेच ते मेणबत्ती पेटवणं... ripम्हणून सांत्वना देणं...!!


"तू" जातेस बये ...जीवानिशी....अनंत वेदना,हुंकार घेऊन...


मग इथे खूप "निष्कर्ष", "चर्चा" होतात... तुलाच नावे ठेवून...!!


"काळ" बदलला....तरी मने...."आदीमचं".......


छे...!!छे..!!! आदिम सुद्धा एव्हढे"लिंगपिसाट"नि विकृत नसतील...!!


"तू" जातेस ग "जगणं" बघायच्या आधीच "परतीच्या" मार्गाकडे...


पण इथे "काथ्याकूट" सुरू होतो तुझी "जात-धर्म-स्त्री"यांना घेऊन...!!


फार झालेत "वाचाळवीर"अन "सोशल" म्हणवणारे "कुपमंडुक"..


"सज्जन".....वगैरे... वगैरे...!!आपली "मंदोदरी" काळकोठडीत" ठेवून...."सीते" चे हरन करू पाहणारे..."रावण"...


सगळं बदलायला हवं.....पण... "तू" गप घरात बसली तरच बदलेल...!!


अशीही "वदंता" करत आहेत बर का...


त्यापेक्षा "तू"......नकोच जन्माला येऊस...!!


म्हणजे सगळे "प्रश्नच" मिटतील....."कायमचे"...!!


 


अजून एक निर्भया


 


- शुभांगी पवार (कंदी पेढा)