विद्याथ्र्यांची शैक्षणिक फी भरुन स्पंदनने जपली सामाजिक बांधिलकी


विद्याथ्र्यांची शैक्षणिक फी भरुन स्पंदनने जपली सामाजिक बांधिलकी


तळमावले/वार्ताहर


पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील चि.स्पंदन रेश्मा संदीप डाकवे यांचेकडून न्यू इंग्लिश स्कूल काळगांव येथील गरीब, गरजू विद्याथ्र्यांची शैक्षणिक फी देण्यात आली. कोवीड-19 च्या पाश्र्वभूमीवर स्पंदनचा सहावा वाढदिवस डाकवे परिवाराने साधेपणाने साजरा करत एक आदर्शवत पायंडा घातला आहे. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सुमारे रु.6,000/- ची मदत देण्यात आली. ही मदत शाळेचे मुख्याध्यापक एस.एस.देसाई, उपशिक्षक व्ही.पी.लटके, कलाशिक्षक बी.आर.कुंभार, एस.पी.धोत्रे, लेखनिक व्ही.टी.देसाई, ग्रंथपाल एम.एस.थोरात, शिपाई बी.एस.पाटील यांचेकडे देण्यात आली.


गणेशोत्सवामध्ये डाॅ.संदीप डाकवे यांनी एक अक्षर गणेश कलाकृती विद्याथ्र्यांसाठी हा उपक्रम राबवला होता. या उपक्रमासाठी सलाम मुंबई फाऊन्डेशनचे व्यवस्थापक अजय पिळणकर, सुनील हुंबरे, पंकज मराठे, महेश घराळ, जीवन काटेकर, सौ.छाया तुकारामसिंह बैस-चंदेल, आशीष कोरडे आणि मित्र परिवार, श्री गणेश मित्र मंडळ चव्हाणवाडी (घराळवाडी नं.2) यांचे सहकार्य लाभले. ही मदत आणि डाकवे परिवाराकडील काही रक्कम अशी मिळून रु.6,000/- ची मदत शाळेतील विद्याथ्र्यांची शैक्षणिक फी भरण्यासाठी देण्यात आली.


फुल ना फुलाची पाकळी या स्वरुपात गरजू विद्याथ्र्यांची शैक्षणिक फी देवून मायेचा आधार डाकवे परिवाराकडून देण्यात आला आहे.‘‘वाढदिवस आपल्या स्पंदनचा, संदेश सामाजिक बांधिलकीचा’’ अशी टॅगलाईन ठेवून डाॅ.संदीप डाकवे, सौ.रेश्मा डाकवे व संपूर्ण डाकवे परिवाराने स्पंदनचा प्रत्येक वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत करण्याचा संकल्प केला आहे.


सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.राजाराम डाकवे, सौ.गयाबाई डाकवे, श्री.भरत डाकवे, सौ.गौरी डाकवे, प्रथमेश डाकवे, पौर्णिमा डाकवे,  सागर डाकवे, ऋषिकेश डाकवे, नितीन पाटील, सौ.ज्योती पाटील, श्री.अक्षय पाटील, शिवछत्रपती प्रतिष्ठान व स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.


विद्याथ्र्यांची शैक्षणिक फी भरुन चि.स्पंदनचा सहावा वाढदिवस साजरा झाला डाकवे परिवाराने राबलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.


 


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


चि.स्पंदन डाकवे आतापर्यंतच्या वाढदिनाचे उपक्रम:


नाम फाऊंडेशनला रु.35,000/- ची मदत


आर्मी बॅटल कॅज्युअल्टीजला रु.5,000/- चा निधी जमा


ग्रंथतुला करुन जि.प.शाळेला रु.11,000/- ची पुस्तके वाटप


दिव्यांग मुलांना चित्रकला साहित्य वाटप


शांताई फौंडेशनला रु.5,000/- किमतीचे जीवनावश्यक साहित्य वाटप


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖