कराडमध्ये रोटरीतर्फे पोलिओ जनजागृती फोर व्हीलर रॅली चे आयोजन


कराडमध्ये रोटरीतर्फे पोलिओ जनजागृती फोर व्हीलर रॅली चे आयोजन


कराड / प्रतिनिधी :


       रोटरी क्लब कराड गेली ६३ वर्षांहून अधिक काळापासून विविध सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. समाजाची नेमकी गरज ओळखून त्या क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करण्याचा रोटरी क्लब कराडच्या नेहमीच प्रयत्न असतो. पोलिओ या महाभयंकर रोगाचा समूळ उच्चाटनासाठी रोटरी इंटरनॅशनल ने भरीव अशी कामगिरी केले आहे व करीत आहे. पोलिओ हा आपल्या भागातून जवळपास नाहीसा करण्यात आपल्याला यश आले आहे.तरीसुद्धा पोलिओ या रोगाविषयी समाजात आणखीन जनजागृती होणे आवश्यक आहे. याचकरिता २४ ऑक्टोबर २०२० या दिवशी पोलिओ दिन चे औचित्य साधून रोटरी क्लब कराड तर्फे कराड शहरामध्ये पोलिओ फोर व्हिलर रॅली चे आयोजन करण्यात आले होते. 


            सध्याच्या कोरोना महामारी चा विचार करता चालत जाण्याच्या रॅलीचे आयोजन न करता, सदरची रॅली चारचाकी (फोर व्हीलर) गाडी मधून काढण्यात आली. 


           ही रॅली शनिवार दिनांक २४ ऑक्टोबर २०२० रोजी स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालय, कराड येथून सकाळी ९.३० वाजता हिरवा झेंडा दाखवुन सुरुवात झाली. नंतर विजय दिवस चाैक - कार्वे नाका - भेदा चौक - कोल्हापूर नाका - दत्त चौक - आझाद चौक - चावडी चौक - कन्याशाळा - कृष्णा नाका सर्कल मार्गे परत उपजिल्हा रुग्णालय मध्ये येऊन रॅलीची सांगता झाली.


 


        या रॅलीमध्ये रोटरी क्लब कराड, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालय, कराड, रोट्रॅक्ट क्लब अॉफ कराड सिटी, इनरव्हील क्लब कराड, इनरव्हील क्लब कराड संगम व ग्रामिण रुग्णालय, उंडाळे चे पदाधिकारी व सदस्य सहभागी होते. रॅलीमध्ये सहभागी सर्वजण मास्क व सोशल डिस्टंसिंग च्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले. याकामी क्लबचे प्रोजेक्ट डायरेक्टर रो राहुल शाह,रो किरण जाधव, रो अभय पवार,रो प्रबोध पुरोहित, रो राहुल पुरोहित, रो डॉ राहुल फासे, रो डॉ मनोज जोशी, रो मनीष जैन, रो राकेश पोरवाल, रो शशांक पालकर, रो धनंजय जाधव, रो मनोज जगताप, रो रघुनाथ डूबल,रो चंद्रकुमार डांगे, रो राजीव खालीपे, रो जगदीश वाघ, रो जयराम सचदेव, रो राजेश खराटे, रो अशोक इंगळे, रो सुहास पवार , रो विक्रांत जाधव, रो अनघा बर्डे इत्यादी सदस्यांचे मोलाचे योगदान लाभले.


       या रॅलीचा शुभारंभ स्व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक मा. डॉ. श्री. प्रकाश शिंदे यांचे शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून झाले. रॅली पूर्ण झाल्यानंतर रोटरी क्लब कराड अध्यक्ष गजानन माने यांनी या पोलिओ रॅलीच्या आयोजनाचे महत्त्व सांगितले तर सेक्रेटरी डॉ. शेखर कोगनुळकर यांनी सर्वांचे आभार मानले. या याप्रसंगी सर्व क्लबचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.