ढेबेवाडी येथील कोविड सेंटर रुग्णांसाठी संजीवनी.


ढेबेवाडी येथील कोविड सेंटर रुग्णांसाठी संजीवनी. 


सणबूर / प्रतिनिधी :


गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नाने ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात 36 आँक्सिजन बेडचे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. गेल्या तिस दिवसात याठिकाणी 51 रुग्ण उपचारार्थ दाखल करण्यात आले. यापैकी 21 रुग्ण बरे झाले तर 27 रुग्ण पुढील उपचारासाठी कराड येथे पाठवण्यात आले आणि 1 रुग्ण दगावला आहे शिवाय तिन रुग्णांवर यशस्वी रित्या उपचार सुरू असून अनेक रुग्णांना वेळेत उपचार दिल्यामुळे ढेबेवाडी कोविड सेंटर पाटण तालुक्यासह ढेबेवाडी विभागासाठी जीवनदायी ठरत आहे.


                गेल्या साडेचार महिन्यात ढेबेवाडी विभागात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढला असून हा आकडा आडीशेपार गेला आहे. या विभागात आज पर्यंत 19 रुग्ण दगावले असून यामुळे विभागात भितीचे वातावरण पसरले होते.शहरातील कोविड सेंटरमध्ये रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्ण आणि नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता यावर उपाय काढत तात्काळ गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी 6 सप्टेंबरला येथील ग्रामीण रुग्णालयात 36 बेडचे कोविड सेंटर सुरु केले.सुरुवातीला प्रचंड अडचणी आल्या परंतु यावर मात करत येथील डॉक्टरांच्या टीमने 51 रुग्णांवर उपचार केले यामध्ये 21 रुग्ण पूर्ण बरे होवून घरी गेले तर 27 रुग्णांना पुढील उपचारासाठी कराड येथील मोठ्या कोविड सेंटरला दाखल करण्यात आले. आणि एक रुग्ण दगावला आहे. शिवाय तीन रुग्णांवर यशस्वीरीत्या उपचार सुरु आहेत. वैद्यकीय अधिक्षक डॉ. दत्तात्रय डोंगरे, डॉ. राजाराम जगताप, डॉ. सुनील जाधव,डॉ. रोहितकुमार दास, डॉ. राहूल बने यांच्यासह विविध उपकेंद्रातील डॉक्टर रुग्णांना जीवदान देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत.


            रुग्णांना ने -आण करण्यासाठी तीन रुग्णवाहिका चोविस तास सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी डॉक्टरांकडून मार्गदर्शन केले जाते. त्याचबरोबर दुध, अंडी, चहा, नाष्ट्यासह सकस आहार दिला जातो. मंत्री शंभूराज देसाई यांनी वेळेत येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर उभारल्याने अनेकांना जीवदान मिळण्यास मदत होत आहे. शिवाय वेळेत उपचार मिळाल्याने विभागतील रुग्ण संख्या कमी होत असल्याची समाधानकारक बाब या आकडेवारीनुसार समोर आली आहे.


…………………………………………………


पाटण तालुक्यातील रुग्णांनी सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी अशी लक्षणे दिसताच ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि कोविड टेस्ट करून घ्यावी त्यामुळे लगेच कोविडचे होवून उपचार घेणे सोपे होईल.


- डॉ. दत्तात्रय डोंगरे. (वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय ढेबेवाडी.) 


…………………………………………………


कोरोना झाल्याचे समजताच सुरुवातीला धक्का बसला नंतर माझ्या पुतण्याने मला ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये दाखल केले येथील डॉ. डोंगरे यांनी माझी विचारपुस करुन धीर दिला आणि माझ्यावर तात्काळ उपचार सुरू केले. औषधाबरोबरच जेवन,चहा,नाष्टा वेळेवर देवून येथील सर्व डॉक्टरसह स्टाफने चांगली सेवा केल्याने आज मी ठंठणित बरा होवून घरी जात आहे.


- बंडू रामचंद्र सलते (कोरोना मुक्त रुग्ण, सलतेवाडी


…………………………………………………