कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कराड पंचायत समितीच्या चला माणूस वाचवूया...... उपक्रमाचे यश.

  पार्ले येथील कोविड सेंटर मधून बरे होवून बाहेर जाणाऱ्या रुग्णांना शुभेच्छा देताना सभापती प्रणव ताटे, उपसभापती- रमेश देशमुख, शिक्षक संघटनाचे अध्यक्ष व पंचायत समितीचे अधिकारी व पदाअधिकारी


पार्लेच्या कोविड सेंटर मधून १४७९ रुग्णांना डिस्चार्ज 


पंचायत समितीच्या चला माणूस वाचवूया...... उपक्रमाचे यश........मृत्यू दर 0 % , तीन रुग्ण वाहिका उपलब्ध


कराड/ प्रतिनिधी-


कराड तालुक्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण दिवसेदिवस वाढायला लागल्यानंतर पार्ले येथे कराड पंचायत समितीच्या पुढाकाराने कोविड१९ नावाने सेंटर सुरु करण्यात आले. आजवर या सेंटरमध्ये २०३१ रुग्ण दाखल झाले होते. तर केंद्रातून ९६६ रुग्ण पूर्ण बरे होवून घरी सोडण्यात आले. याशिवाय ९६० रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ५१३ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत.


 या सद्या या ठिकाणी १४९ रुग्णावर उपचार सुरु आहेत. तर १३३ रुग्ण विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहेत. या सेंटर साठी सर्व सुविधा मोफत पुरविण्यात येत आहेत. २० ऑक्सिजन बेड तयार करण्यात आले असून रेमडीसिवर सुद्धा उपलब्ध करून देण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून प्रयत्न कण्यात येत आहेत.


   अजूनही वाढीव गरजा पूर्ण व्हाव्या याकरिता कराड तालुक्यातील प्राथमिक शिक्षक संघटना एकत्रित येवून आर्थिक भर उचलत आहेत. शिक्षकांच्या माध्यमातून अजून सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. या मुळे सर्वसामान्य माणसाला हक्काचे सेंटर उपलब्ध झाले आहे. या सेंटर मुळे अनेकांचे प्राण वाचले असून मृत्युदर शून्य टक्के आहे. प्रत्येक माणूस वाचला पाहिजे अशी  कराड पंचायत समितीची भूमिका आहे. आज या केंद्रातून एवढ्या लोकांना घरी सोडण्यात आले. यावेळी कराड पंचायत समितीचे सभापती- प्रणव ताटे, उपसभापती- रमेश देशमुख, सदस्य- काशिनाथ कारंडे, सह. गटविकास अधिकारी- उषा साळुंखे, तालुका वैद्यकीय अधिकारी- संगीता देशमुख,


विस्तार अधिकारी- नितीन जगताप,आनंद पळसे, शिक्षक संघटना अध्यक्ष- प्रदीप रवलेकर, गणेश जाधव, जहांगीर पटेल, यांची उपस्थिती होती.