"आशेचा नवा किरण.....!!"

 "आशेचा नवा किरण.....!!" 


"इंटरनेटवर संचार करताना एक फोटो नजरेला पडला.इन्स्टाग्रामवर दुबईतील एक स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.समेर चैब यांनी हा फोटो पोस्ट केला आहे. एक नवजात बाळ त्यांच्या चेहऱ्यावरचा मास्क ओढत आहे.असा तो मस्त फोटो....!!


       खरेतर गेली जवळपास७-८महिने आपण सारे,अन सारे जगच "कोरोनाच्या"विळख्यात गुरफटून,अस्वस्थ, निराश,कळाहीन बनलो आहे."स्वछंदपणे,उन्मुक्त होऊन हवे तसे जगण्याची सवय असलेला" मानवप्राणी" ह्या,अभूतपूर्व संकटाने विमनस्क ,हतबल झाला आहे. चेहऱ्यावरचे हास्य,जगण्याचे बळ कमी झाले आहे. एकदम भेसूर निराशा असलेलं वातावरण, श्वास अन एकंदरीत जगणं कोंडून, गुदमरून टाकत असताना....निराशेच्या कभिन्न गर्तेत जातोय की काय असे वाटत असताना....हे बाळ जन्माला आलंय नि त्याने चक्क डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचा मास्क ओढून ....."नकोच आता ऐसे जगणे....आता हवे मुक्तपणे वागणे...!!असेच म्हणायचे असेल न त्या छोट्याला?


       लवकरच ही महामारी,निराशा, चिंता , गुदमरलेपण संपेल नि सारं काही पूर्ववत होऊन अवघ विश्व सुरळीतपणे पूर्वपदावर येईल.हास्य, मोकळा श्वास घेत जगणं सुरू होईल....हेच ह्या छोट्याने त्याच्या आगमनाने सांगितले नाही का?


 सकारात्मक आशावाद दाखविणारा हा फोटो माझ्या हृदयाला थेट स्पर्शून गेला.नव्या बदलाची सुखद नवस्वप्ने दाखवत....बरोबर ना ?


 


- शुभांगी पवार (कंदी पेढा)