शिवसमर्थ च्या पाटण शाखेचे आज नवीन जागेत स्थलांतर.


शिवसमर्थ च्या पाटण शाखेचे रविवारी नवीन जागेत स्थलांतर


 


तळमावले/वार्ताहर


दि शिवसमर्थ मल्टी.को.आॅप.क्रे.सोसा.लि; तळमावले च्या पाटण शाखेचे रविवार दि.25 आॅक्टोंबर, 2020 रोजी दसÚयाच्या शुभमुहूर्तावर नवीन जागेत स्थलांतर होत आहे. रविवार 20 डिसेंबर, 2015 रोजी संस्थेच्या पाटण शाखेचे उद्घाटन झाले होते. आज त्या शाखेचे स्थलांतर नवीन बसस्थानकाशेजारी, अपना बझारजवळ, दोंडे पूल, कराड-चिपळूण रोड, ता.पाटण, जि.सातारा. या प्रशस्त ठिकाणी होत आहे.


त्या निमित्त श्रीसत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड.जनार्दन बोत्रे यांनी केले आहे.


स्वच्छ, पारदर्शक कारभाराने लोकांच्या विश्वासास पात्र ठरलेने अवघ्या 14 वर्षात 45 शाखांसह संस्थेने 200 कोटी ठेवींची उलाढाल केली आहे. त्याचबरोबर चांगला नावलौकीक प्राप्त केला आहे. संस्था 365 दिवस अविरत सेवा देत असते. या संस्थेने आर्थिक देवाण-घेवाणीबरोबरच सामाजिक बांधिलकी म्हणून संस्थेच्या वतीने अनेक उपक्रम राबवले आहेत.


संस्थेने सातत्याने अनेक आकर्षक ठेव योजना सुरु केल्या आहेत. संस्थेच्या माध्यमातून आर्थिक सेवा देत असताना ग्रामीण भागातील लोकांची पत वाढवणे, त्यांना मानसन्मान देणे विनामुल्य घरपोच सेवा देणे, एका शाखेतून दुसÚया शाखेत विनामुल्य पैसे घेण्याची सुविधा देणे असे नाविण्यपूर्व उपक्रम त्यांनी राबिवले आहेत. तसेच संस्थेचे स्वमालकीचे मुख्य कार्यालय तळमावले येथे सुसज्ज असे सी.बी.एस. आॅन लाईन बॅंकींग सुविधा देणारे असून तळमावले येथे एटीएम सुविधा सुरु करण्यात आली आहे. संस्थेच्या तळमावले, मलकापूर कराड, कोल्हापूर, कोपरखैराणे शाखेत गोदरेज लाॅकर सुविधा आहेत. तसेच मोठे लाॅकर स्वस्त वाजवी दरात उपलब्ध आहेत. सर्व शाखेतून पॅनकार्ड बनवण्याची सुविधा जनतेस देण्यात येत आहे. रविवार पेठ कराड, शेडगेवाडी, वाडी रत्नागिरी या शाखेत मिनीएटीएम सुविधा उपलब्ध आहेत.


संस्थेच्या शाखा स्थलांतर कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.