पेपर कटींग आर्टमधून साकारले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे चित्र.


पेपर कटींग आर्टमधून साकारले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे चित्र


डाॅ.संदीप डाकवे यांची कलाकृती: डाकेवाडीच्या शिरपेचात खोवला मानाचा तुरा


तळमावले/वार्ताहर


पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांनी ‘पेपर कटींग आर्ट’ या आगळ्यावेगळ्या कलाकृतीच्या माध्यमातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे चित्र साकारत त्यांना जयंतीदिनी अभिवादन केले आहे. यापूर्वी त्यांच्या कलेची दखल ‘इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड’, ‘हायरेेंज वल्र्ड बुक आॅफ रेकाॅर्ड’ने घेतली आहे. डाॅ.डाकवे यांच्या अभूतपूर्व यशामुळे डाकेवाडीच्या शिरपेचाात मानाचा तुरा खोवला आहे.


 नेहमी विविध चित्रे रेखाटत असताना काहीतरी वेगळे करण्याच्या भावनेतून त्यांनी ‘पेपर कटींग आर्ट’ मधून चित्र तयार केले आहेत.


रांगोळी, पोट्रेट पेंटींग, वाॅल पेंटींग, व्यंगचित्रे, शब्दचित्रे अशा चित्रकलेच्या विविध माध्यमात काम करत असताना डाॅ.संदीप डाकवे यांनी ‘पेपर कटींग आर्ट’ कला आत्मसात केली आहे. त्या माध्यमातून ते पोट्रेट साकारण्याचा प्रयत्न करत आहेत.


‘पेपर कटींग आर्ट’ मधून त्यांनी यापूर्वी लोकनेते बाळासाहेब देसाई, मुख्यमंत्री ना.उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची चित्रे तयार केली आहेत. ही चित्रे तयार करण्यासाठी डाॅ.संदीप डाकवे यांना कलाशिक्षक बाळासाहेब कचरे, जयंत कदम, सुरेश जाधव, भरत कुुंभार, वडील राजाराम डाकवे, शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे यांचे विशेष मार्गदर्शन लाभते.


2 ऑक्टोबर हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचा दिवस. महात्मा गांधी यांना कलेच्या माध्यमातून आगळी वेगळी श्रध्दांजली वाहण्यासाठी हे चित्र तयार केले असल्याचे कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांनी सांगितले आहे. त्यांनी तयार केलेल्या या चित्राचे परिसरातून कौतुक होत आहे.