सामाजिक कार्यकर्ते  आप्पासो सुतार यांची अ.भा.भ्र.नि.सं.समिती सदस्यपदी नियुक्ती 


उंब्रज :आप्पासो सुतार यांना नियुक्ती पत्र प्रदान करताना समिती मान्यवर 


(छाया - भगवंत लोहार)


पाटण/प्रतिनिधी :


कळंत्रेवाडी, ता कराड येथील सामाजिक कार्यकर्ते, श्री पंचवदन विश्वकर्मा सामाजिक संस्था उंब्रज चे अध्यक्ष आप्पासो निवृत्ती सुतार यांची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या सदस्यपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. 


               ही नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष  प्रदीप पाटील खंडापूरकर तसेच प्रदेश अध्यक्ष  बाबूराव क्षेत्रे पाटील यांच्या सूचनेनूसार सातारा जिल्हा कार्याध्यक्ष  प्रदीपराज गायकवाड तसेच जिल्हा उपाध्यक्ष  सुरेश साळुंखे यांनी केली आहे.  सर्वसामान्यांचे, तळागाळातील शोषित घटकांचे प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार आहे असे आप्पासो सुतार यांनी यावेळी स्पष्ट केले. 


          श्री. सुतार यांनी दहा वर्ष कळंत्रेवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून  उल्लेखनीय काम केले असून लोहार सुतार समाजातील जनतेला एकवटून त्यांचे प्रश्न अडीअडचणी सोडवल्या जाव्यात, समाजाला संघटित करण्यासाठी श्री पंचवदन विश्वकर्मा सामाजिक संस्थेच्या माध्यमातुन स्वतःला सामाजिक कार्यात झोकून देऊन समाजमनावर एक वेगळा ठसा उमटवला आहे. ह्या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंतचे त्यांचे कार्य हे उल्लेखनीय ठरलेले आहे.


          या निवडीबद्दल परिसरातील सामाजिक, राजकीय तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.