जागतिक टपालदिनी डाॅ.संदीप डाकवे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन.


जागतिक टपालदिनी डाॅ.संदीप डाकवे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन


 


तळमावले/वार्ताहर


महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विविध दैनिकांत लिहलेल्या पत्रांच्या संग्रहाचे पुस्तक ‘समाजस्पंदनाची पत्रे’ या नावाने जागतिक टपाालदिनी प्रकाशित करणार असल्याचा मानस या पुस्तकाचे लेखक डाॅ.संदीप डाकवे यांनी केला आहे. 9 आॅक्टोंबर हा जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो. सध्याच्या सोशल मिडीयाच्या जमान्यात पत्रलेखनाची कला दुर्मिळ होत चालली आहे. परंतू या कलेला जिवंत ठेवण्याचे काम डाॅ.डाकवे यांनी केले आहे. शुक्रवार दि.9 आॅक्टोंबर, 2020 रोजी ज्या डाकघरातून पहिले पत्र पाठवले त्याच डाकघरामधील पोस्टमन काकांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.


या पुस्तकाला ज्येष्ठ वृत्तपत्रलेखक दादासाहेब वसगडेकर यांची प्रस्तावना लाभली आहे. हा आगळावेगळा आनंदाचा क्षण असल्याचे मत डाॅ.डाकवे यांनी व्यक्त केले आहे. पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या विशेष सहकार्यातून या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. या पुस्तकात त्या त्या वेळी असलेल्या समस्या पत्रातून वर्तमानपत्रांना पाठवलेल्या आहेत. तसेच तत्कालीन घडामोडींवर मतप्रदर्शन केले आहे.


डाॅ.संदीप डाकवे यांनी आपल्या पत्रकारितेची, लेखनाची सुरुवात सन 2001 मध्ये ‘वाचकांचा पत्रव्यवहार’ या सदरामधून केली. त्यांची सुमारे 500 पत्रे विविध दैनिके, साप्ताहिके, मासिके यामधून प्रसिध्द झाली आहेत. यातील काही पत्रांची मांडणी या पुस्तकात केली आहे.


विविध लेखनाबरोबर पत्रलेखनाचा छंद डाॅ.संदीप डाकवे यांनी कौशल्यपूर्वक जपला आहे. या छंदातून त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपÚयात अनेक मित्र जोडले आहेत. ज्यांना आतापर्यंत प्रत्यक्ष भेटता आलेले नाही परंतू एकमेकांशी पत्रातून संवाद होत असतो. अशा पत्रमैत्री छंदाची दखल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पत्र पाठवून


घेतली आहे. यामध्ये डाॅ.संदीप डाकवे याच्या या अनोख्या पत्रमैत्री छंदाचे कौतुक माजी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, श्रीमंत छ.खा.उदयनराजे भोसले, महंत आबानंदगिरीजी महाराज, माजी शालेय शिक्षण मंत्री ना.विनोद तावडे, सिक्कीमचे माजी राज्यपाल व खा.श्रीनिवास पाटील, खा.अरविंद सावंत, खा.डाॅ.अमोल कोल्हे, गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई, सुप्रसिध्द उद्योजक व कामत हाॅटेलचे मालक विठ्ठल कामत, सुप्रसिध्द व्याख्याते प्राचार्य डाॅ.यशवंत पाटणे, कवी इंद्रजित भालेराव,  गझलकार प्रदीप निफाडकर, राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त शिक्षिका ज्योती जीवनदास शहा, अक्षरमित्र ओंकार पाटील, ग्रंथप्रसारक शरद जोशी, डी.एम.मेस्त्री यांचा आवर्जून समावेश करावा लागेल.


गतवर्षी 9 आॅक्टोंबर या टपालदिनी इलेक्टाॅनिक मिडीयावर डाॅ.संदीप डाकवे यांच्या पत्रमैत्री छंदावर स्पेशल रिपोर्ट दाखवण्यात आला होता.


डाॅ.संदीप डाकवे यांचे आतापर्यंतचे हे 4 थे पुस्तक आहे. यापूर्वी ‘मनातल’ं हा चारोळीसंग्रह स्वतःच्या वाढदिनी, जलयुक्त शिवार अभियान लेखसंग्रह पुस्तिका बाळासाहेब देसाई यांच्या जयंतीदिनी, ‘दीप उजळतो आहे’ या फोटोबायोग्राफी पुस्तकाचे प्रकाशन गणेश चतुर्थीदिवशी केले आहे. तर या पुस्तकाचे प्रकाशन टपालदिनी करुन एक वेगळा मुहूर्त डाॅ.डाकवे यांनी साधला आहे.


डाॅ.संदीप डाकवे यांनी पत्रमहर्षी दे.र.भागवत वृत्तपत्रलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच त्यांना उत्कृष्ट पत्रकारितेबद्दल महाराष्ट्र राज्य शासनाकडून 4 वेळा गौरवले आहे. विविध उपक्रमांच्या छंदांची नोंद इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड या पुस्तकात दोनदा तर ‘हायरेंज बुक आॅफ वल्र्ड रेकाॅर्ड’ या पुस्तकात एकदा झाली आहे. याशिवाय स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेली 4 वर्षापासून विविध सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवले आहेत. ‘समाजस्पंदनाची पत्रे ’हे वेगळया स्वरुपातील पुस्तक उल्लेखनीय असेच आहे.


 


 


 -----