शिवसमर्थची प्रगती कौतुकास्पद - गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई


शिवसमर्थची प्रगती कौतुकास्पद - गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई


तळमावले/वार्ताहर


दि शिवसमर्थ मल्टीस्टेट को.आॅप.क्रेडीट सोसायटी लि; तळमावले चे प्रगती कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन महाराष्ट्र राज्य ना.शंभूराज देसाई यांनी केले. ते पाटण शाखेच्या स्थलांतरित कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी संस्थेचे उपमहाव्यवस्थापक हेमंत तुपे, संदीप डाकवे, बाजीराव पवार, बाळासाहेब संकपाळ, श्रीधर हावळे व अन्य मान्यवर उपस्थित होते.


शुभारंभा नंतर ना.शंभूराज देसाई यांनी संस्थेच्या एकंदरित वाटचालीचा आढावा घेतला. या कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त करत संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर पाटण शाखेच्या स्थलांतर नवीन प्रशस्त जागेमध्ये करण्यात आले. त्यानिमित्त श्री सत्यनारायण पूजा आयोजित केली होती. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड.जनार्दन बोत्रे, शिवाजी सुर्वे, माजी पं.स.सदस्य नानासाहेब सावंत तसेच परिसरातील अनेक मान्यवरांनी संस्थेला सदिच्छा भेटी देवून शुभेच्छा दिल्या.


दरम्यान, संस्थेच्या शिवसमर्थ प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन पाटण तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी, पाटण नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष संजय कुंभार, देवबा वायचळ सर, बळवंत पाटील, संतोष कदम सर व अन्य मान्यवर यांनी केले.


स्वच्छ, पारदर्शक कारभाराने लोकांच्या विश्वासास पात्र ठरलेने अवघ्या 14 वर्षात 45 शाखांसह संस्थेने 200 कोटी ठेवींची उलाढाल केली आहे. त्याचबरोबर चांगला नावलौकीक प्राप्त केला आहे. 365 दिवस अविरत सेवा कार्यरत असते. या संस्थेने आर्थिक देवाण-घेवाणीबरोबरच सामाजिक बांधिलकी म्हणून संस्थेच्या वतीने अनेक उपक्रम राबवले आहेत. संस्थेने सातत्याने अनेक आकर्षक ठेव योजना सुरु केल्या आहेत. संस्थेच्या माध्यमातून आर्थिक सेवा देत असताना ग्रामीण भागातील लोकांची पत वाढवणे, त्यांना मानसन्मान देणे विनामुल्य घरपोच सेवा देणे, एका शाखेतून दुसऱ्या शाखेत विनामुल्य पैसे घेण्याची सुविधा देणे असे नाविण्यपूर्व उपक्रम त्यांनी राबिवले आहेत. तसेच संस्थेचे स्वमालकीचे मुख्य कार्यालय तळमावले येथे सुसज्ज असे सी.बी.एस. आॅन लाईन बॅंकींग सुविधा देणारे असून तळमावले येथे एटीएम सुविधा सुरु करण्यात आली आहे. संस्थेच्या तळमावले, मलकापूर कराड, कोल्हापूर, कोपरखैराणे शाखेत गोदरेज लाॅकर सुविधा आहेत. तसेच मोठे लाॅकर स्वस्त वाजवी दरात उपलब्ध आहेत. सर्व शाखेतून पॅनकार्ड बनवण्याची सुविधा जनतेस देण्यात येत आहे. रविवार पेठ कराड, शेडगेवाडी, वाडी रत्नागिरी या शाखेत मिनीएटीएम सुविधा उपलब्ध आहेत.


कार्यक्रम यशस्वीतेसाठी इंद्रजित कणसे, सुशांत तुपे, विजय सवादकर, गणेश जाधव, ज्ञानेश्वर ठोंबरे, चेतन साठे, ओमकार पानस्कर, विशाल गालवे, ओमकार पवार, सुहास कणसे, नंदा मगदूम, निलम पानस्कर यांनी विशेष परिश्रम घेतले.