जगन्नाथ माळी रोटरी क्लब च्या 'नेशन बिल्डर अँवार्ड' पुरस्काराने सन्मानित


जगन्नाथ माळी रोटरी क्लब च्या 'नेशन बिल्डर अँवार्ड' पुरस्काराने सन्मानित.


कराड दि.१२


उंडाळे ता कराड येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक जगन्नाथ सदाशिव माळी यांना सन 2020 चा इंटरनँशनल कराड रोटरी क्लब या सामाजिक संस्थेच्यावतीने वतीने दिला जाणारा "नेशन बिल्डर अँवार्ड पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले.नुकताच त्यांना हा पुरस्कार समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आला.           


   श्री. माळी 21 वर्षापासुन उंडाळकर विद्यालयात ज्ञानदानाचे काम करत आहेत. उपक्रमशील शिक्षक म्हणून ते परिचित आहेत. राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक म्हणून काम करताना, हरीत सेनेच्या वतीने विभागात वृक्षारोपण करणे, गांवे दत्तक घेवुन वृक्षलागवड करणे, फिरती बाग तयार करणे,पर्यावरण पूरक सण, उत्सव अधुनिक पध्दतीने साजरे करणे, प्लॅस्टिक निर्मूलन साठी कागदी पिशव्या तयार करणे, त्याचे वितरण करणे आदी विविध उपक्रम त्यांनी प्रभावीपणे राबवले आहेत.याची दखल घेत विद्यालयास सामाजिक वनीकरण विभागाचा पंचतारांकित हरित शाळा पुरस्कार प्राप्त झालाआहे.


          श्री माळी यांच्या अशा विविध उपक्रमांची दखल घेऊन कराड रोटरी क्लबने 'नेशन बिल्डर अँवार्ड' पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला  


   हा कार्यक्रम सोशल डिटन्सचे पालन करत रोटरी क्लब ऑफ कराड चे अध्यक्ष डॉ गजानन माने. सचिव डॉ. शेखर कोगनुळकर.किरण जाधव, आदीच्या पुरस्कार वितरण करण्यात आले. . हा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री माळी यांचे संस्थेचे अध्यक्ष जयसिंगराव पाटील, प्राचार्य बी.पी मिरजकर, , संचालक अँड आनंदराव पाटील, सचिव बी. आर. यादव, निरीक्षक आर. ए. कुंभार., एम बी. पाटील, व्ही. के. शेवाळे. पर्यवेक्षक बी आर पाटील, शिक्षक. शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.