कराड रोटरी क्लबच्या नेशन बिल्डर पुरस्कारांचे वितरण, 18 शिक्षकांचा सन्मान


रोटरी इंटरनॅशनल क्लब च्या वतीने दिल्या पुरस्कार समवेत. सत्कारमूर्ती शिक्षक व रोटरी क्लब ऑफ कराड चे पदाधिकारी. 


कराड/प्रतिनिधी : कराड रोटरी क्लब कराड यांच्या वतीने देण्यात येणार्‍या नेशन बिल्डर पुरस्काराने यंदा 18 शिक्षकांना सन्मानित करण्यात आलेले. प्राथमिक, माध्यमिक, व उच्च माध्यमिक शिक्षकांचा यात समावेश आहे. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. येथील सिद्धार्थ मंगल कार्यालयात पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम नुकताच झाला. covid-19 च्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेऊन हा कार्यक्रम झाला रोटरी क्लबचे अध्यक्ष गजानन माने, सचिव डॉ. शेखर कोगनुळकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. यावेळी रोटरी चे पदाधिकारी राहुल उर्फ जगन्नाथ पुरोहित, किरण जाधव, जगदीश वाघ, रघुनाथ डुबल, धनंजय जाधव यांची यावेळेला उपस्थिती होती, यावेळी प्राथमिक स्तरातील, राजश्री रवलेकर(कोळे)मंजुषा चव्हाण (जिजामाता नगर वारुंजी) शुभांगी पवार( पाल) स्मिता रणदिवे (वाघेरी) सुनील भिलारे गलमेवाडी( पाटण) नाजुकबी जमादार (कामरगाव पाटण) माध्यमिक शहरातून अनिल थोरात (लाहोटी कन्या शाळा कराड) जगन्नाथ माळी (दादासाहेब उंडाळकर विद्यालय उंडाळे) राजेंद्र जाधव (शिवाजी हायस्कूल मसूर) जीवनराव थोरात (टिळक हायस्कूल कराड) मीना थोरात (विजयनगर) संगिता भोई '(शिवाजी हायस्कूल कराड) रवी जाधव (न्यू इंग्लिश स्कूल सदाशिव गड) जयश्री शेडगे (आत्माराम विद्यालय ओगलेवाडी) रूपाली तोडकर( सरस्वती विद्यामंदिर) नारायण जगताप (डी. के. पालकर विद्यालय) पुनम पवार (नूतन मराठी शाळा अगाशिवनगर) उच्च माध्यमिक विभागात डॉ. सुधीर कुंभार के. बी. हायस्कूल ढेबेवाडी) आदींना या पुरस्काराने गौरवण्यात आले. डॉ. शेखर कोगनुळकर यांनी प्रास्ताविक केले. किरण जाधव सूत्रसंचालन केले यावेळी जगन्नाथ माळी, राजेंद्र जाधव, यांनी सत्काराला उत्तर दिले.