सहा दिवसात उभारले कोविड सेंटर.
ना.शंभूराज देसाई यांची सामाजिक बांधिलकी
पाटण / प्रतिनिधी :सातारा जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे.कराड, सातारा याठिकाणी ऑक्सिजन बेडची कमतरता जाणवू लागली आहे.ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे कोरोना बाधित व्यक्तींच्या मृत्यूंच्या संख्येत वाढ होत आहे.अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी म्हणून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर राज्याचे नगरविकासमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्या सहकार्यातून कोवीड केअर सेंटर उभे करुन पाटण विधानसभा मतदारसंघातील कोरोना बाधितांना उपचार देणेकरीता आम्ही पुढाकार घेतला केवळ पाच ते सहा दिवसात हे कोरोना कोवीड सेंटर उभे करण्याचे काम केले असून येथे 50 ऑक्सिजन बेड,25 नॉन ऑक्सिजन बेड अशी एकूण 75 बेडची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.आवश्यक असणारे 18 वैद्यकीय अधिकारी,17 कर्मचारी, औषधसाठा उपलब्ध करण्यात आला आहे. आजपासूनच हे सेंटर कोरोना रुग्णांना उपचाराकरीता खुले करण्यात आले आहे असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केले आहे.
दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर पाटण विधानसभा मतदारसंघातील कोरोना बाधित रुग्णांच्या उपचाराकरीता एकूण 75 बेडचे कोरोना केअर सेंटर उभारण्यात आले असून या कोरोना केअर सेंटरचा तसेच सेंटरकरीता आवश्यक अद्यावत ॲम्ब्यूलन्सचा लोकार्पण सोहळा गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी युवा नेते यशराज देसाई,प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार समीर यादव,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.रघूनाथ पाटील,ग्रामीण रुग्णालय वैद्यकीस अधीक्षक डॉ.चंद्रकांत यादव,नोडल अधिकारी डॉ.शिकलगार,पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजित पाटील,मल्हारपेठचे सपोनी अजित पाटील,देसाई कारखान्याचे संचालक मंडळातील संचालक,जि.प.व पं.स सदस्य तसेच कोरोना केअर सेंटर उभारणारे संबधित ठेकेदार,कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले,गेल्या सहा महिन्यात सातारा जिल्ह्यात कोरोना बाधित व्यक्तींच्या संखेत फार मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे.अलीकडच्या काळात कोरोनाबाधित व्यक्तींच्या मृत्यूच्या संख्येत झालेली वाढ ही चिंताजनक आहे.सद्यपरिस्थितीत जिल्ह्यामध्ये कराड असो किंवा सातारा येथे ऑक्सिजन बेड मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत.ऑक्सिजन न मिळाल्यामुळे काहींचा मृत्यू झाला असल्याचे निष्पन्न होत आहे.याकरीता आपण ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात 35 ऑक्सीजन बेडचे केअर सेंटर सुरु केले, पाटणच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतीगृहात 25 ऑक्सीजन बेडचे सेंटर सुरु करण्याचे काम प्रगतीपथावर आहे तसेच कारखाना कार्यस्थळावर 50 ऑक्सीजन बेडचे आणि 25 नॉन ऑक्सीजन बेडचे केअर सेंटर सुरु करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आता ढेबेवाडीचे 35 आणि कारखाना कार्यस्थळावरील 50 याप्रमाणे कोरोना बाधितांच्या उपचाराकरीता बेड उपलब्ध झाले आहेत आवश्यकता भासल्यास 25 नॉन ऑक्सीजन बेड आम्ही ऑक्सीजनसह तयार ठेवले आहेत.पाटणचे 25 ऑक्सीजन बेड येत्या 4 ते 5 दिवसात उपलब्ध होतील.
दौलतनगच्या कोरोना केअर सेंटरमध्ये एक नोडल अधिकारी,प्राथमिक आरोग्य केंद्राचे 02 वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी,खाजगी सराव करणारे 16 डॉक्टर, 08 नर्स, 03 फार्मासिस्ट, 04 वॉर्ड बॉय, ॲम्बूलन्सकरीता स्वतंत्र्य ड्रायव्हर, डेटा ऑपरेटर 01 अशाप्रकारे वैद्यकीय पथक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.सेंटरमध्ये तीन रुममध्ये 50 ऑक्सीजनचे बेड तर मोठया हॉलमध्ये 25 नॉन ऑक्सीजन बेड ठेवण्यात आले आहेत. गिझर, 100 लिटर शुद्ध पाणी,नवीन टॉयलेट तसेच येथे वैद्यकीय सेवा देणाऱ्या वैद्यकीय पथकाकरीता स्वतंत्र्यपणे राहण्याची व्यवस्था, कोरोना रुग्णांची ऑनलाईन नोंदणी करणेकरीता संगणक, प्रींटर, इंटरनेट आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात जनतेला ज्याप्रकारे अन्नधान्यांची मदत करण्यात आली. त्याच पद्धतीने कोरोना बाधित व्यक्तींसाठी कोरोना सेंटर उभे करण्याचा आम्ही निर्णय घेतला.या केअर सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना व्यक्तीश: गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंकडून नाष्ता, जेवण देण्यात येणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
नगरविकासमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे कोरोना केअर सेंटरला मोलाचे सहकार्य.
दौलतनगर ता.पाटण येथील कोरोना केअर सेंटर सुरु करणेकरीता तसेच या सेंटरकरीता आवश्यक असणारी अद्यावत ॲम्ब्यूलन्स उपलब्ध करुन देणेकरीता शिवसेना पक्षाचे गटनेते व राज्याचे नगरविकासमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. पाटण मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो असेही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यावेळी बोलताना म्हणाले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖